Actress Seema Dev | ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

मुंबई : Actress Seema Dev | हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणार्‍या प्रसन्न व्यक्तीमत्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव Actress Seema Dev (वय ८१) यांचे दीर्घ आजाराने आज निधन (Passed Away) झाले. पहिल्या चित्रपटापासून सुपरहिट ठरलेल्या रमेश देव (Ramesh Dev) हे त्यांचे पती होते. त्यांच्या मागे अजिंक्य (Ajinkya Dev) व अभिनय देव (Abhinaya Dev) हे दोघे मुले आहेत.

सीमा देव (Actress Seema Dev) यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात उल्लेखनीस काम करीत आपला ठसा उमटवला होता.
त्यांनी जवळपास ८० हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले. त्यांचा जन्म मुंबईत २७ मार्च १९४२ मध्ये झाला होता.
आलीया भोगाशी या चित्रपटाद्वारे त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पर्दापण झाले. त्यात रमेश देव हे त्यांचे नायक होते.
त्यानंतर जगाच्या पाठीवर मध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. १९६२ मध्ये वरदक्षिणा हा चित्रपट दोघांनी केला होता.
चित्रपटाच्या कथेनुसार सीमा दुसर्‍या पुरुषाशी लग्न करण्यास मदत करताना रमेश त्यांच्या प्रेमात पडतो.
चित्रपटातील कथेप्रमाणे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात, आणि त्याचवर्षी विवाहबद्ध झाले. त्यानंतर दोन दशक ही जोडी हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत एकत्र दिसले.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्याबरोबरचा आनंद या चित्रपटात या
जोडीचे काम लक्षात राहिल असे होते. मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे
त्यांचे चित्रपट विशेष गाजले.

राजा परांजपे प्रतिष्ठानने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले होते.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २०१७ मध्ये त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mental health | Perfect बनण्याच्या अट्टाहासात लोक होत आहेत मानसिक आजारी, जाणून घ्या ब्रेन कसा ठेवावा हेल्दी!

Ear Infection Increases During Monsoon: Here’s How You Can Deal With It Naturally

24 August Rashifal : कर्क आणि कुंभ राशीवाल्यांना मिळू शकते मोठी डील फायनल करण्याची संधी, वाचा १२ राशींचे दैनिक भविष्य

How To Reduces Belly Fat | उपवास केल्याने पोटाची चरबी जलद वितळते का? वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे किती योग्य, जाणून घ्या एक्सपर्टचे मत