Actress Sonam Kapoor | बाळाच्या जन्मानंतर अभिनेत्री सोनम कपूरचे मनोरंजन विश्वात पुनरागमन, ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री सोनम कपूरचे (Actress Sonam Kapoor) नाव बॉलीवुडच्या सुप्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणले जाते. अभिनेत्री सोनमच्या अभिनयाची आणि फॅशनची चर्चा कायम असते. पण उद्योजक आनंद अहुजा (Anand Ahuja) याच्यासोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर सोनम घराच्या जबाबदाऱ्या सांभाळत होती. ती एका मुलाला जन्म दिला असून ती मातृत्वाची जबाबदारी पार पाडताना दिसली. (Sonam Kapoor Son) 4 वर्षे तिचा कोणताही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. आता तब्बल 4 वर्षांनंतर अभिनेत्री सोनम कपूर (Actress Sonam Kapoor) नव्या प्रोजेक्टमधून दमदार कमबॅक करणार आहे.

अभिनेत्री सोनम कपूर जिओ सिनेमाच्या (Jio Cinema) ‘ब्लाइंड’ या चित्रपटात (Blind Movie) झळकणार आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर सोनमचा हा पहिला चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शोम माखिजा (Director Shom Makhija) यांनी केले आहे. जियो स्टुडिओने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट या चित्रपटाचे पोस्टर आऊट केले आहे.या पोस्टखाली त्यांनी ‘काही वेळा खरं पाहणं अवघड असतं’ असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सोनमचे चाहते तिच्या 4 वर्षांनंतर येणाऱ्या सिनेमासाठी उत्सुक असल्याचे कमेंटवरुन कळत आहे. अनेक चाहते सोनमवर शुभेच्छाचा वर्षाव करत आहे. येत्या 7 जुलै रोजी ब्लाइंड सिनेमा (Blind Movie Release Date) जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात सोनम कपूर अहुजा सोबतच पुरब कोहली (Purab Kohli), विनय पाठक (Vinay Pathak) आणि अभिनेत्री लिलेट दुबे (Lillet Dubey) भूमिका साकारणार आहेत.

अभिनेत्री सोनम कपूरने Actress Sonam Kapoor) मनोरंजन विश्वात आपली स्वतंत्र जागा निर्माण केली आहे. 2007 साली ‘सावंरिया’ (Saawariya) चित्रपटातून तिने बॉलीवुडमध्ये (Bollywood) पदार्पण केले. त्यानंतर सोनमने नीरजा (Neerja), रांझणा(Raanjhanaa), वीरे दी वेडिंग (Veere Di Wedding), प्रेम रतन धन पायो (Prem Ratan Dhan Payo) यासारखे हिट चित्रपट दिले आहेत. आता ती पुनरागमनासाठी सज्ज आहे.

Web Title : Actress Sonam Kapoor | sonam kapoor blind release date and poster look out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा