Today Horoscope | 28 June Rashi Bhavishya : धनु, मकर आणि कुंभसह या ३ राशीच्या जातकांना मिळेल शुभवार्ता, वाचा दैनिक राशिफळ

नवी दिल्ली : Today Horoscope | ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर, दैनंदिन कुंडली आपल्याला सांगते की, या दिवशी ग्रह-तारे अनुकूल आहेत की नाही. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल (Today Horoscope) किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात, ते जाणून घेवूयात (Dainik Rashifal).

 

मेष (Aries Daily Horoscope)

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मेष राशीच्या लोकांना आज मोठे पद मिळू शकते. चांगल्या विचारसरणीचा फायदा घ्याल. अनुभवाने मित्रांना मदत कराल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस सामान्य आहे. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. अन्यथा समस्या येऊ शकते. मेहनतीचे फळ मिळेल. बाहेरच्या व्यक्तीच्या बाबतीत ढवळाढवळ करू नका, अन्यथा अडचण येऊ शकते. एखाद्या गोष्टीवरून संततीशी वाद होऊ शकतो.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

आजचा दिवस बुद्धी आणि विवेकाने निर्णय घेण्याचा आहे. नोकरीच्या ठिकाणी कोणतेही अवघड काम कनिष्ठांच्या मदतीने वेळेत पूर्ण कराल. काही मोठी उद्दिष्टे लवकरच पूर्ण होतील. एखादी चांगली बातमी ऐकायला मिळाली तर ती लगेच कुणाला सांगू नका. मित्रांसोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. जवळच्या व्यक्तींचे पूर्ण सहकार्य मिळेल. उत्साहाने पुढे जाल. प्रतिष्ठा वाढल्यामुळे आनंदी रहाल.

मिथुन (Gemini Daily Horoscope)

दिवस नात्यांमध्ये मजबूती आणेल. कोणाशी वाद असेल तर तो संयमाने सोडवावा. विद्याथ्र्यांची मानसिक ओझ्यातून सुटका होईल. कार्यक्षेत्रात काही बदल केले तर चांगला फायदा होईल. एखादा जुना व्यवहार डोकेदुखी ठरू शकतो. जोडीदाराचा सल्ला व्यवसायासाठी प्रभावी ठरेल. एखाद्या जोखमीच्या कामात हात घालणे टाळावे, अन्यथा अडचण येऊ शकते.

कर्क (Cancer Daily Horoscope)

आजचा दिवस अनुकूल आहे. बंधुभाव वाढवाल. नवीन लोकांसोबत सामंजस्य करण्यात यशस्वी व्हाल. एखादी इच्छा पूर्ण झाल्यास आनंदी व्हाल. घरात काही शुभ कार्यक्रम होईल. ज्यामध्ये नातेवाईक येतील. कौटुंबिक परिस्थिती अनुकूल असेल. भावांची पूर्ण साथ मिळेल.

सिंह (Leo Daily Horoscope)

राजकीय क्षेत्रात सावधगिरी आणि सतर्कता बाळगा. घरात एखादे शुभ कार्यक्रम असल्यास दिवस आनंदात जाईल. प्रतिकूल परिस्थिती उद्भवली तर त्यात धीर धरावा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवा, अन्यथा समस्या येऊ वाढतील. जोडीदाराला वाईट वाटू शकते. आईला पोटाचा त्रास असेल तर हलगर्जीपणा करू नका, अन्यथा वाढू शकतो. संततीला कोर्समध्ये प्रवेश देऊ शकता.

कन्या (Virgo Daily Horoscope)

भागीदारीसाठी दिवस चांगला आहे. नवीन योजना सुरू करू शकता. सासरच्या लोकांकडून आदर मिळेल. बुद्धिमत्ता आणि विवेकाने काम करून आश्चर्यचकित कराल. विद्याथ्र्यांनी एखादी परीक्षा दिली असेल तर निकाल येऊ शकतो. वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. सर्जनशील प्रयत्नांना यश मिळेल. संतती अपेक्षा पूर्ण करेल. नवीन करारामुळे फायदा होईल.

तुळ (Libra Daily Horoscope)

तूळ राशीच्या लोकांमध्ये त्याग आणि सहकार्याची भावना राहील. कौटुंबिक संबंध दृढ होतील. कामाच्या ठिकाणी चांगल्या विचारसरणीचा फायदा घ्याल. विद्याथ्र्यांची बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून सुटका होईल. नवीन काम करणे चांगले राहील. परदेशातून आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. धीर धरा. वडिलांच्या सल्ल्याने पुढे गेलात तर चांगला फायदा होईल.

वृश्चिक (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस उत्पन्नाचे नवीन स्रोत घेऊन येईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. गुपिते कुटुंबातील सदस्यांसमोर येऊ शकतात. कामात काही अडथळे असतील तर ते आज दूर होतील. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यात व्यस्त रहाल. जे लोक घरापासून दूर नोकरी करतात, त्यांना आज कुटुंबातील सदस्यांची आठवण येऊ शकते. त्यांना भेटायला येऊ शकतात.

धनु (Sagittarius Daily Horoscope)

आजचा दिवस फायदेशीर आहे. कामाच्या ठिकाणी एखादी जबाबदारी सोपवली असेल तर ती चांगल्या प्रकारे पार पाडा. अधिकाऱ्यांचा विश्वास जिंकू शकाल. आज व्यवसायात वाढ झाल्याने आनंद राहील. एखाद्या गोष्टीवरून जवळच्या लोकांशी वाद होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नोकरीमुळे पार्टी आयोजित केली जाऊ शकते, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील. संतती अपेक्षा पूर्ण करेल.

मकर (Capricorn Daily Horoscope)

दिवस नोकरीच्या ठिकाणी मोठी संधी घेऊन येणार आहे. मित्रांसोबत मोठ्या गुंतवणुकीची योजना आखू शकता. एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळू शकतात. कलात्मक कौशल्याने कामाच्या ठिकाणी लोकांना आश्चर्यचकित कराल. वरिष्ठ सदस्यांचे सहकार्य आणि समर्थन मिळेल. महत्त्वाची संधी हातून जाऊ देऊ नका. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली संधी मिळू शकते.

कुंभ (Aquarius Daily Horoscope)

आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कामावर लक्ष केंद्रित करा. विविध विषयांमध्ये स्पष्टता असेल. एखादे मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. आरोग्याशी संबंधित समस्या दीर्घकाळ असेल तर त्यापासून आराम मिळेल. जे लोक करिअरबद्दल चिंतित आहेत ते आज एक छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात. घरातील आणि बाहेरील कामात संतुलन राखावे, अन्यथा कुटुंबातील सदस्यांना राग येऊ शकतो.

मीन (Pisces Daily Horoscope)

आजचा दिवस कामाच्या ठिकाणी योजना बनवण्याचा असेल. सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. कुटुंबात एखादा कलह असेल, तो दूर करण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल. आज उद्धटपणे बोलू नका, नाहीतर तुमचे बोलणे एखाद्याला वाईट वाटू शकते. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. मनात स्थिरतेची भावना कायम राहील. नोकरी करणाऱ्या लोकांनी अधिकाऱ्यांशी बोलूनच निर्णय घेणे योग्य ठरेल.

 

 

Web Title :  Today Horoscope | Rashi Bhavishya 28 june 2023 know today horoscope daily horoscope prediction for libra virgo aries

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा