Monsoon Update | महाराष्ट्रासह देशातील 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली/मुंबई : Monsoon Update | सध्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे, तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) देशातील 25 राज्यांमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा (Monsoon Update) इशारा दिला आहे. दरम्यान, दिल्लीत (Delhi) 3 जुलैपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आसाम (Assam) राज्यात सध्या मुसळधार पाऊस (Monsoon Update) सुरू आहे. बारपेटा येथे पावसाने कहर केला आहे. आसाममध्ये काही भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट –

राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. राज्यात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कोकणासह (Konkan) पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

‘या’ राज्यात मुसळधार –

अरुणाचल प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ.

Web Title : Monsoon Update | heavy rain warning in 25 states of the country imd rain news maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा