Actress Tamanna Bhatia | गेली 18 वर्षे पाळलेला नियम प्रिय व्यक्तीसाठी मोडला; तमन्नाच्या चित्रपटात ‘तो’ सीन

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या चिपटांमुळे आणि अभिन्यामुळे अभिनेत्री तमन्ना भाटिया (Actress Tamanna Bhatia) हिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मागील 18 वर्षांपासून ती प्रेक्षकांचे मनोरंज करत असून सतत नवनवीन हीट चित्रपट ती देत आली आहे. सध्या तमन्ना ही तिच्या आगामी चित्रपट व तिच्या प्रेमामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री तमन्नाचा लवकरच ‘लस्ट स्टोरीज 2’ (Lust Stories 2) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामधील तिचा को- ॲक्टर आणि बॉयफ्रेंड अभिनेता विजय वर्मा (Actor Vijay Verma) सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. मात्र अभिनेत्री तमन्नाने (Actress Tamanna Bhatia) गेली 18 वर्षे सांभाळलेला एक नियम या सिनेमामध्ये मोडला आहे.

 

 

अभिनेत्री तमन्ना हीने दाक्षिणात्य सिनेमांबरोबरच बॉलीवुडमध्येही (Bollywood) आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अनेक वर्षे ती काम करत असली तरी कधीच शुटिंगमध्ये इंटिमेट सिन दिलेले नाहीत. तिने सिनेमांमध्ये काम करताना कधीही किसिंग सिन देणार नाही असा नियम स्वत:च स्वत:ला घालून घेतला होता. मागील पूर्ण वर्षे तिने तो पाळला आहे. तमन्नाचे अनेक चाहते आहेत पण त्यांना ती कधीच असे सिन करताना दिसली नाही. आता मात्र तमन्नाने हा नियम मोडला आहे. तिच्या आगामी चित्रपटात ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये ती अभिनेता आणि तिचा बॉयफ्रेंड विजय वर्मा सोबत ऑन स्क्रिन किसिंग सिन देताना दिसणार आहे.

 

तिच्या या किसिंग सिनबाबत (Tamanna kissing Scene) तिला विचारले असता तिने आपले मत मांडले आहे. ती म्हणाली की, पडद्यावर मला रोमान्स करताना प्रेक्षकांना नक्कीच संकोचल्यासारखं वाटलं असं मला वाटायचं. म्हणून मी किसिंग सीन न देण्याचा निर्णय घेतला होता. मी आजवर कधीही इंटिमेट सीन दिले नाहीत तरीदेखील या भूमिकेसाठी सुजॉय घोष (Sujoy Ghosh) यांनी माझी निवड केली याचं मला खूप कौतुक आहे.

या पुढे ती म्हणाली की, “गेल्या काही वर्षात भारतीय प्रेक्षक वर्ग विचारांनी बराच प्रगल्भ झाला आहे पण मी केवळ प्रसिद्धीसाठी नो किसिंग पॉलिसी तोडलेली नाही. मी 18 वर्षांपासून काम करतीये. या काळात माझे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आणि त्यासाठी मला कधी इंटिमेट सीनही द्यावे लागले नाहीत.

 

 

मागील अनेक दिवसांपासून तमन्ना आणि विजय (Tamanna And Vijay) चर्चेत आहेत.
त्यांच्या गोव्यातील किसिंग व्हिडीओमुळे ते ट्रोल देखील झाले. मात्र तमन्ना आणि विजय दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली आता दिली आहे.
हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत असून आता त्यांचा रोमांस प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. (Actress Tamanna Bhatia)

 

 

 

Web Title :  Actress Tamanna Bhatia | is tamanna bhatia broke her 18 year no kissing policy rule for vijay varma

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंसाठी भाजपची दारं खुली, पण…’, उपमुख्यमंत्र्यांची खुली ऑफर

Shruti Marathe | एकेकाळी साऊथमध्ये काम केल्यामुळे मराठीमध्ये नव्हते मिळत काम; अभिनेत्री श्रुती मराठेने सांगितले इंडस्ट्रीमधील अनुभव

Ajit Pawar | शिंदे-फडणवीसांच्या नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले-‘जोपर्यंत…’