‘तूप’ आहे निरोगी आयुष्याचा ‘मंत्र’, ‘हे’ 10 चमत्कारीक फायदे वाचून लगेच सुरू कराल!

पोलीसनामा ऑनलाइन – आयुर्वेदात तुपाचे महत्व सांगण्यात आले आहे. यामध्ये अनेक औषधे तुपातून घेण्याचा सल्ला दिला जातो. तूपाचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास वजन कमी होऊ शकते. म्हणूनच आहारतज्ज्ञ चपातीला तेलाऐवजी तूप लावून खाण्याचा सल्ला देतात. हे मधुमेहींसाठीही लाभदायक आहे. तूप पौष्टिक असून यामुळे शरीराचे आरोग्य आणि सौंदर्य उत्तम राहाते. तूपामुळे वजन वाढते किंवा कोलेस्ट्रॉल वाढतात हा विचार बदला. तूप आरोग्याच्या समस्या वाढवत नाही तर समस्यांवरील उपाय आहे.

तूपाचे हे आहेत फायदे

1. तूपामुळे ब्लड सेल्समधील कॅल्शिअम कमी होते. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे होतं. रोगप्रतिकार शक्ती मजबुत होते.
2. जेवणात तूपाचा समावेश केल्यास गॅसची समस्या दूर होते.
3. तूपाचा स्मोकिग पॉइंट कमी असल्याने तूप सहजपणे जळत नाही आणि त्यामुळेच हे पचण्यासाठी उत्तम आहे. यामुळे चपाती आणि तूप एकत्र खाल्ल्याने पचनशक्ती उत्तम होते.
4. ग्लुकोमा (काचबिंदू) आणि डोळ्यांच्या इतर आजारावर तूप गुणकारी आहे.
5. तूप खाल्याने स्मरणशक्ती वाढते. मेंदूची कार्यक्षमता वाढते.
6. तूपातील पौष्टिक घटक त्वचेचा कोरडेपणा दूर करतात. त्वचा तजेलदार ठेवतात.
7. शुद्ध तूपातील सीएलए मेटाबॉलिज्म अ‍ॅक्टिव्ह ठेवते. यामुळे वजन कमी होते. इन्सुलिनचे प्रमाण कमी राहते. ब्लड शुगरही नियंत्रणात राहते. पोटही खुप वेळ भरल्यासारखे वाटते.
8. हार्टला होणारे ब्लॉकेज दूर होतात. तूप एका ल्यूब्रिकंट्सप्रमाणे हार्ट आणि ब्लड वेसल्सचं काम नियंत्रणात ठेवतं. त्यामुळे हृदयाशी निगडीत आजार दूर करण्यास मदत होते.
9. तूपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स, पोटॅशिअम यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात. यामुळे सांधेदुखीचा त्रासही कमी होतो. पीसीओडी, मधूमेह, ब्लड प्रेशर, अ‍ॅसिडीटी यासह अनेक समस्यांवर ते गुणकारी आहे.
10. रक्त आणि आतड्यांमधील कोलेस्ट्रॉल कमी होतं.

किती प्रमाणात खावे
तूप प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले तर नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे दररोज फक्त एक टी स्पून तूपापेक्षा जास्त तूप खाऊ नये. घरी तयार केलेले तूप शक्यतो खा. बटरसाठी हा चांगला पर्याय आहे. मात्र, कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.