विंग कमांडर ‘अभिनंदन’ यांच्या मिशीला ‘राष्ट्रीय मिशी’ घोषित कर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकभेच्या अधिवेशनात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु असताना काँग्रेसच्या मागणीने सभागृहात गोंधळ उडाला. काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी हि विचित्र मागणी केली. बालाकोट एयरस्ट्राइकनंतर पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक करणाऱ्या भारताच्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला पुरस्कार देण्याच्या मागणीबरोबरच त्याच्या मिशीला राष्ट्रीय मिशी म्हणून घोषित करण्याची विचित्र मागणी केली. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी यावेळी भाषण करताना मोदी सरकारवर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली. त्याचबरोबर त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली. या भाषणात त्यांनी बालाकोट हवाई हल्याचा उल्लेख केला.

याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले कि, बालाकोट हवाई हल्ल्याचे समर्थन काँग्रेस देखिल करत आहे. त्याचबरोबर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला पुरस्कार देण्याच्या मागणीबरोबरच त्याच्या मिशीला राष्ट्रीय मिशी म्हणून घोषित करण्याची मागणी देखील केली. अभिनंदन यांच्या या कामगिरीने अनेक भारतीय तरुणांना प्रेरित केले आहे,त्यामुळे त्याला पुरस्कार देण्यात यावा. त्यांच्या या मागणीवर संपूर्ण सभागृहाने दाद देत टाळ्या वाजवल्या.

पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला
१४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी भारतीय लष्करच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात भारताचे ४० जवान शाहिद झाले होते. त्यानंतर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी विमान घेऊन पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करत दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानाने केलेल्या हवाई हल्ल्यात भारताचे विमान पडून अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडला होता. त्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानने पुन्हा त्याला भारताच्या हवाली केले होते. दरम्यान, काँग्रेसच्या या मागणीवर सत्ताधारी भाजप काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.