Aditi Tatkare | सभागृहात सत्ताधारी पक्षाचे लोकच कामकाजात खोडा घालत आहेत – अदिती तटकरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळी अधिवेशनात वाद आणि सभात्यागाचे सत्र सलग सर्व दिवस सुरू आहे. यात कधी सत्ताधारी पक्षांचे आमदार कामकाजात व्यत्यय आणत आहेत, तर कधी विरोधी पक्षांचे. शुक्रवारी देखील अनेक कारणांवरून विरोधकांकडून कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. यावर राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सभागृहातील कामकाज व्यवस्थीत पार पाडण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. पण, सत्ताधारी पक्षातील लोकच अनावश्यक मुद्दे घेऊन भाषणे करत सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यास भाग पाडत आहेत, असे आदिती तटकरे (Aditi Tatkare) म्हणाल्या.

तटकरेंनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तटकरे म्हणाल्या, विरोधक आणि सत्ताधारी विदर्भात अधिवेशन झाले नाही अशी तक्रार करत होते. कोरोनाच्या महामारीमुळे विदर्भात दोन वर्ष अधिवेशन होऊ शकले नाही. नागपूरमधील आमदार निवास आणि बहुतांशी इमारती कोवीड सेंटरमध्ये रुपांतरीत केल्या गेल्या होत्या. त्यामुळे मागील दोन वर्षांची अधिवेशने मुंबईतच पार पडली. पण आज जेव्हा नागपूरला अधिवेशन सुरू आहे, तेव्हा विदर्भातील किती विषयांवर सभागृहात चर्चा होते आहे, किती विषयांमध्ये शेवटच्या सदस्यापर्यंत सर्वांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळते आहे, विदर्भातील किती आमदारांना विदर्भाची भूमिका मांडण्याची संधी दिली गेली, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे.

सर्वांना बोलण्याची संधी दिली गेली नाही. गुरुवारी सभागृह सात ते आठ वेळा तहकूब करण्यात आले.
सभागृह चालविण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते.
पण त्यांनीच खोडा घालून सभागृह सात-आठ वेळा तहकूब करण्यास लावले.
विनाकारण त्याचा आरोप विरोधी पक्षांवर केला गेला. आम्ही सभागृह चालविण्यात सहकार्य करत आहोत.
पण सत्ताधारी करत नाही. समोरील बाजूचे आमदार विनाकारण कामकाजात नसलेला मुद्दा काढून सभागृहाचा
वेळ वाया घालवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची जनता या अधिवेशनाकडे पाहत असेल,
तर त्यांचा भ्रमनिरास होणार आहे, असे तटकरे (Aditi Tatkare) म्हणाल्या.

Web Title :- Aditi Tatkare | It is the people of the ruling party in the House who are messing up the work – Aditi Tatkare

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | …त्यामुळे आम्ही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत – रोहित पवार

Jayant Patil Suspension | जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांचा अजित पवारांना फोन (व्हिडिओ)

Post Office Franchise | पोस्ट ऑफिसमधून करायची असेल कमाई तर अशी करा गुंतवणूक, भासणार नाही पैशांची अडचण