Rohit Pawar | …त्यामुळे आम्ही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत – रोहित पवार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा विधानसभेतील अधिवेशनाची हवा बदलली आहे. कर्नाटकने गुरुवारी महाराष्ट्राच्या विरोधात एक प्रस्ताव पारित केला. यात त्यांनी महाराष्ट्राला एक इंच देखील जागा देणार नाही, असे म्हटले आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. विरोधी पक्षांनी या मुद्यावर चर्चेची मागणी केली. पण चर्चा नाकारल्याने आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याप्रकरणी विस्तृत माहिती दिली आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सुटलाच पाहिजे. पण विधानसभेत विरोधकांना कोणत्याच मुद्यावर बोलू दिले जात नाही. कोणत्याही मुद्यावर चर्चा घेतली जात नाही. आम्हाला युवकांचे, विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे मुद्दे विधानसभेत मांडायचे आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि सीमा भागाचे प्रश्न आम्हाला मांडायचे आहेत. पण आम्हाला विधानसभेत बोलू दिले जात नसेल, आणि आमचा विरोधी पक्षनेता सभागृहात आवाज उठवत असेल, त्याला विरोध केला जात असेल, तर आम्हाला कामकाजात सहभागी व्हायचे नाही, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

ज्या पद्धतीने हे सरकार वागत आहे, ते निषेधार्ह आहे.
त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षांसमोर सत्ताधारी पक्षाचे आमदार आंदोलन करत आहेत. हे आजपर्यंत कोणत्याही विधानसभेत घडले नाही. दिशा सालियन नावाच्या एका मुलीने आत्महत्या केली. तिच्या आईने सांगितले आहे, की माझ्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण करू नका. तरी देखील तिचा मुद्दा उकरून काढत सत्ताधारी तो विषय विधानसभेत नाचवत आहेत. त्यामुळे लोकांच्या कामाचे आणि आमचे महत्वाचे विषय बाजूला पडतात, असे देखील पवार म्हणाले.

गुरुवारी कर्नाटक राज्याच्या विधानसभेने महाराष्ट्राच्या विरोधात प्रस्ताव संमंत केला.
त्यावर सत्ताधारी पक्षातील आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काही बोलत नाहीत,
त्यामुळे आम्ही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत, असे पवारांनी स्पष्ट केले.

Web Title :- Rohit Pawar | …So we are boycotting the proceedings of the House – Rohit Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil Suspension | जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांचा अजित पवारांना फोन (व्हिडिओ)

Post Office Franchise | पोस्ट ऑफिसमधून करायची असेल कमाई तर अशी करा गुंतवणूक, भासणार नाही पैशांची अडचण