आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या सीईओ दुबे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाने आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे दिले नाही म्हणून रुग्णाला डांबून ठेवल्याप्रकरणी आणि रुग्णाच्या नातेवाईकांना धक्काबुकी केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या मुख्य रेखा दुबे, यांच्यासह तिघांविरुद्ध डांबून ठेवणे, मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी (दि.२२) गुन्हा दाखल झाला आहे.
[amazon_link asins=’B074G3TJYF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d0630992-a617-11e8-a8f7-e9a8eabe2e36′]

या प्रकरणी संजय दशरथ आरडे (३८, रा. कैलासनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. तर रुग्णालय व्यवस्थापनाच्या रेखा दुबे, राजेश दुबे आणि बाऊन्सर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार “दशरथ शिवाजी आरडे (७२, रा. कैलासनगर, पिंपरी) यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना ८ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

उपचारासाठी त्यांनी रुग्णालयात दहा हजार रुपये भरले. आरडे हे आर्थिक दुर्बल घटकांतील असल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दाखविले. तरीही रुग्णालयाने त्यांच्यावर मोफत उपचार केले नाहीत. उपचारानंतर त्यांना ११ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र बिल न भरल्याने रुग्णालयाने त्यांना सोडलेले नाही. तसेच त्यांचे औषध व जेवणही बंद केले. त्यांच्या नातेवाइकांनाही भेटू दिले नाही, बाऊन्सरकडू त्यांना धक्काबुकी करण्यात आली.
[amazon_link asins=’B07BCGC13F,B072XP1QB7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d7373bf6-a617-11e8-bf9d-1fd37a518884′]

यामुळे रुग्णालय व्यवस्थापन व सीईओ रेखा दुबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करत आहेत.

आरडे यांना रुग्णालयात दाखल केल्यांनतर त्यांच्यावर योग्यते उपचार करण्यात आले आहेत. डिस्चार्ज देताना ते बील भरण्यास तयार होते. परंतु, अचनाक त्यांनी आर्थिक दुर्बल घटकाबाबत सांगितले. तेव्हा यासाठी प्रक्रिया असते, तसेच प्रत्येक रुग्णाला ही सुविधा देणे शक्य नसल्याचे आम्ही त्यांना सांगितले होते. पोलिस ठाण्यात आमच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे रेखा दुबे यांनी म्हटले आहे.