Aditya Thackeray | अंधेरी पूर्व पोटनिवडणूक माणुसकी विरुद्ध खोकासूर, आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन (Andheri By Election) राज्यात मोठे राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) आणि शिंदे गट, असे युद्ध सुरु झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) विरुद्ध भाजप आणि शिंदे यांचे संयुक्त उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) अशी लढत होणार आहे. त्यामुळे आता दोनही बाजुंनी टीका आणि आरोप प्रत्यारोपाचे धनुष्यबाण सुरु आहेत. आज दोनही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यावर दोनही गटांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी माध्यामांसोबत संवाद साधला. ही निवडणूक माणुसकी विरुद्ध खोकासूर अशी असल्याचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ही निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी (NCP) विरुद्ध शिंदे आणि भाजप युती अशी आहे. मुरजी पटेल (Murji Patel) हे स्थानिक उमेदवार आहेत. त्यांची या भागात लोकप्रियता आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून केवळ सहानुभूतीचे राजकारण सुरु आहे. आमचे धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याला देखील तेच जबाबदार आहेत, असे दीपक केसरकर म्हणाले.

मनपाच्या नियमांमध्ये लटके यांचा राजीनामा मान्य होणार नाही, हे ठाकरे गटाला माहिती होते. त्यामुळे त्यांनी हा सर्व डाव रचला होता. न्यायालयाचा आदेश नीट वाचला तर लक्षात येईल की, हे ठाकरे गटाचे षडयंत्र होते, असा आरोप केसरकर यांनी केला.

ऋतुजा लटके यांचा अर्ज भरताना शिवसेनेच्या ठाकरे गटाने शक्तीप्रदर्शन केले होते.
यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर आरोप केले.
एखाद्या महिलेला सतावणे किती योग्य आहे? महापालिका आणि खोके सरकार ऋतुजा लटके निवडणूक
कशा लढणार नाहीत, यासाठी प्रयत्न करत होते. पण न्यायालयाने त्यांना चांगला धडा दिला आहे.
त्यामुळे माणुसकी विरुद्ध खोकासूर अशी ही लढाई होणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

Web Title :- Aditya Thackeray | deepak kesarkar replied to aditya thackeray citicism in andheri east bypoll

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uday Samant | उदय सामंत यांचा थेट इशारा, म्हणाले – ‘ज्यावेळी भाजप आमचा वापर करतंय असं वाटेल, तेव्हा आम्ही…’

Jayant Patil | पोलीस दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, जयंत पाटील यांचा आरोप

Nitesh Rane | आज जर का रमेश लटके हयात असते, तर ते…,  नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप