Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटाला सवाल; म्हणाले – ‘बाळासाहेबांच्या सुपुत्राने जेव्हा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळवले. हे सर्व होत असताना शिवसेनेत नवीन चेहरे निर्माण होत आहेत. निष्ठावंत शिवसैनिक पुढे येत आहेत. त्यामुळे राज्यातील हे अल्पआयुचे सरकार कोसळणार असा घणाघात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटावर केला आहे.

 

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने ठाण्याच्या घोडबंदर परिसरात एक रोजगार मेळावा भरविण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘राजकीय कार्यक्रम, मेळावे होत असतात. ज्या व्यक्तीला आम्ही पुढे आणले, त्या एका गद्दाराने राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळविले, याची लाज वाटते. असे आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. तसेच मागील सहा महिन्यांत जिथे कुठे कार्यक्रम असतात. तिथे एकच कॅसेट त्यांच्याकडून वाजत असते.’ असाही आरोप यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केला.

यावर पुढे बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले की, ‘राज्यात नवे वाद-विवाद निर्माण झाले, गद्दारीची भावना निर्माण झाली, राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळविले. हे सर्व राज्यात घडत असताना नवे चेहरे निर्माण होत आहेत. निष्ठावंत शिवसैनिक पुढे येत आहेत. त्यामुळे राज्यातील अल्प आयुचे हे खोके सरकार कोसळणारच. ४० जणांनी व्ही.आर.एस. (स्वेच्छा निवृत्ती) घेतला असून त्यांचे चेहरे पुन्हा महाराष्ट्रात दिसणार नाही. असे देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

 

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले
की, ‘सत्ताधाऱ्यांचा राजकीय वर्ग हा तुम्हाला धर्मा-धर्मात, जाती-जातींमध्ये भांडवित आहेत.
मागील सहा महिन्यांत मोघलशाही सुरु असल्याचे चित्र आहे. निवडणूका जाहीर केल्या जात नाहीत.
शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. ज्या चाळीस गद्दारांना आयुष्यात सामाजिक आणि राजकीय ओळख दिली.
निवडून आणले, मोठी मंत्रीपदे दिली. पण ज्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी हे एका टेबलवर चढून नाचत होते,
अशी घाणेरडी लोक आज सत्तेवर बसले आहेत.’ असा घणाघात त्यांनी शिवसेना पक्ष साडून गेलेल्या चाळीस आमदारांवर केला.

 

Web Title :- Aditya Thackeray | the government will collapse two or three months aditya thackeray accusation against shinde group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | भाजप शहरअध्यक्ष व पदाधिकार्‍यांना छत्रपती संभाजी महाराजांच्याच नावाचा विसर?

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन; दाऊदच्या नावे फोन करून केली खंडणीची मागणी

Shweta Sharma | अभिनेत्री श्वेता शर्माच्या ‘त्या’ डान्स व्हिडिओवर चाहते घायाळ