आदित्य ठाकरेंच्या सभेचा मंडप कोसळला

गेवराई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची जनआर्शिवाद यात्रा सध्या बीड जिल्ह्यात असून आज गेवराईत सभा होणार आहे. या सभेसाठी मंडप उभारण्याचे काम सुरु होते. वादळी वाऱ्यांमुळे हा मंडप कोसळला आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

गेवराईला सकाळपासूनच जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आज दुपारी १ वाजता आदित्य ठाकरे यांची येथे सभा होणार आहे. या सभेसाठी मंडप तयार करण्यात आला होता. या ठिकाणी काही कामगार काम करत होते. अन्य कोणीही कार्यकर्ते सभा मंडपाजवळ नव्हते. जोरदार वाऱ्यांमुळे हा मंडप कोसळला आहे. आता ही सभा होणार का याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –