निर्भया केस : पटियाला हाऊस कोर्टाचा दोषींसाठी नवे ‘डेथ वॉरंट’ जारी करण्यास ‘नकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने सर्व युक्तीवादानंतर राज्य सरकारची याचिका फेटाळली आहे. कोर्टाने म्हटले की, दिल्ली हायकोर्टाच्या 5 फेब्रुवारीच्या आदेशानुसार एक आठवड्याचा कालावधी 11 फेब्रुवारीला पूर्ण होतो आणि अक्षयची दया याचिका 6 फेब्रुवारीला राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. यासाठी कोर्टाने नवे डेथ वॉरंट जारी करण्यासाठी दिल्ली सरकारने काही कालावधीनंतर नवीन अर्ज करावा, असे म्हटले.

राज्य सरकारने या प्रकरणी खालच्या न्यायालयाकडे दोषींच्या फाशीची नवी तारीख जारी करण्याची मागणी केली होती. सुनावणीदरम्यान दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी म्हटले की, याबाबत माहिती नव्हते की आज शुक्रवारी येथे सुनावणी आहे.

कोर्टात निर्भयाची आई आशा देवी यांचे वकील जितेंद्र झा यांनी म्हटले की, सुप्रीम कोर्टमध्ये शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने सात दिवसांच्या दिलेल्या कालावधीला सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केले आहे. तर दोषी मुकेशचे वकील म्हणाले, सुप्रीम कोर्टाने याकडे लक्ष नव्हते, या दरम्यान तेथे असणार्‍या पब्लिक प्रॉसिक्यूटरने कोर्टाला नवे डेथ वॉरंट जारी करू शकता असे म्हटले. यावेळी न्यायाधीशांनी प्रश्न विचारला की हायकोर्टाच्या सात दिवसांचे काय करणार ? यावेळी उपस्थितीत पब्लिक प्रोसिक्यूटर शत्रुघ्न चौहान यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 14 दिवसांचा कालावधी आपण दोषींना देतो अशात 7 दिवस तर त्यांना मिळतील, असे म्हटले.

जाणून घ्या सरकारी वकील काय म्हणाले
दोषींना नवे डेथ वॉरंट जारी करण्यासाठी झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील इरफान अहमद यांनी कोर्टाला सांगितले की, आतापर्यंत या प्रकरणात तीन दोषींची दया याचिका फेटाळण्यात आली आहे. याशिवाय दोषींचा कोणताही अर्ज न्यायालयात प्रलंबित नाही.