Advocate Gunaratna Sadavarte | सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्यां मराठा आंदोलकांसाठी प्रसिद्ध वकील सरसावले! एक पैसा न घेता लढणार केस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Advocate Gunaratna Sadavarte | राज्य सरकारने (State Government) ४० दिवसानंतर सुद्धा मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) कोणताही निर्णय न घेतल्याने अखेर मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाजाचे आंदोलक साखळी उपोषणाला बसले आहेत. तसेच राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे, यामुळे राज्यातील वातावरण तापू लागले आहे. त्यातच आज सकाळी वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड काही लोकांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मराठा आंदोलकांसाठी आता प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर सतीश मानशिंदे (Criminal Lawyer Satish Manshinde) पुढे आले आहेत. मानशिंदे हे सदावर्ते यांची गाडी फोडणाऱ्या मराठा आंदोलकांची केस एक रुपयाची फी न घेता लढणार आहेत. यामुळे आता सदावर्ते विरूद्ध मानशिंदे अशी लढाई न्यायालयात रंगणार आहे.

सतीश मानशिंदे हे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर आहेत. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात (Mumbai Serial Bombing Case) अडकलेला अभिनेता संजय दत्तचे (Actor Sanjay Dutt) वकीलपत्र घेतल्यानंतर ते चर्चेत आले. राम जेठमालानी यांच्याकडे अनेक वर्षे काम केले आहे. विविध बॉलिवूड सेलिब्रिटींच्या केसेस ते लढतात.

आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास मुंबईतील पऱळ येथील वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरासमोरील गाड्यांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांसमोरच हा प्रकार घडला. यानंतर सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले.

सदावर्ते यांनी म्हटले की, मला कोणीच शांत करू शकणार नाही. माझ्या घराजवळ येऊन वाहनांची तोडफोड केली.
झेपणार नाही आणि पेलणार नाही असे जरांगे म्हणत होते ते हेच का? माझ्या घरासमोर येऊन काही लोकांनी रेकी केली.
एका चॅनलने हे दाखवले. हे षडयंत्र आहे. मी थांबणार नाही. या घटनांची सुरुवात पोलिसांवरील हल्ल्यापासून झाली,
ती माझ्या घरावर आली. ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थ पडले, त्या जरांगेंना अटक करा. त्यांच्या मुसक्या आवळा.

सदावर्ते यांच्या या आरोपांना उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचे नाही.
मात्र, त्यांच्या गाडीवरील हल्ल्याचे आम्ही समर्थन करणार नाही. नेमके काय झाले आहे, त्याबद्दल मला काहीच माहित नाही.
मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. या हल्ल्यासाठी ते कोणाचेही नाव घेतील. उद्या ते देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांचे देखील नाव घेतील. आम्ही कसे उपोषण करावे याबद्दल त्यांनी सांगण्याची गरज नाही.
त्यांनी त्यांचे पाहावे. मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न सदावर्ते करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | विमाननगर परिसरात दहशत माजवणाऱ्या करण हतागळे व त्याच्या एका साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 72 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

NCP MLA Amol Mitkari On Ravana Dahan | अमोल मिटकरींचा रावण दहन प्रथेवर आक्षेप; हिवाळी अधिवेशनात करणार ‘ही’ मोठी मागणी