वडगाव मावळ बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. तुकाराम काटे

वडगाव मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – वडगाव मावळ बार असोसिएशनच्या २०२९-२० या एक वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये अ‍ॅड. तुकाराम काटे यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे वडगाव मावळ बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. काटे यांची निवड करण्यात आली. चुरशीच्या लढतीमध्ये काटे पॅनलने विरोधी पॅनलचा धुव्वा उडवला.

बार असोसिएशनच्या निवडणुकीत काटे पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले. मात्र, खजिनदार पदासाठी झालेल्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान मते पडली. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना समान कालावधी करीता पदाचा कार्यभाग देण्यात येणार आहे. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. रविंद्र दाभाडे यांनी काम पाहिले.

नवनियुक्त कार्यकारणी खालील प्रमाणे
अध्यक्ष –
अ‍ॅड. तुकाराम काटे
उपाध्यक्ष – अ‍ॅड. सुरेंद्र दाभाडे
सचिव – अ‍ॅड. महेंद्र खांदवे, अ‍ॅड. जयश्री शितोळे
खजिनदार – अ‍ॅड. दिपक वाकडे, अ‍ॅड. प्रफुल्ल लुंकड
सदस्य – अ‍ॅड. सुभाष तुपे, अ‍ॅड. अमोल दाभाडे, अ‍ॅड. विदुला वर्तक, अ‍ॅड. सुप्रिया तिखे, अ‍ॅड. विश्वनाथ जादव, अ‍ॅड. संकेत शिंदे.

आरोग्यविषयक वृत्त

पावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम

प्रत्येक कुटुंबाकडे ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असणे फायद्याचे

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

#YogaDay2019 : दीर्घायुष्य प्राप्त करू शकता, धरा योगाची वाट

#YogaDay2019 : ‘सेक्स पॉवर’ जागृत करण्‍यासाठी करा योगासने