‘पानिपत’ सिनेमाच्या ‘ट्रेलर’ मुळे अफगाणिस्तानमध्ये ‘असंतोष’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपत : द ग्रेट बेट्रेयल सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमावरून आता वादाला तोंड फुटताना दिसत आहे. या सिनेमात अफगाणिस्तानचा शासक अहमद शाह अब्दालीची भूमिका दाखवण्यात आली आहे. अफगाणिस्तानमध्ये अहमद शाह अब्दालीला मानणारा मोठा वर्ग आहे. तेथे अब्दालीचा उल्लेख अहमद शाह बाबा असा केला जातो. अहमद शाह बाबाचे पात्र यात क्रूर दाखवू नये अशी मागणी अफगाणिस्तानातून केली जाताना दिसत आहे.

अफगाणिस्तानच्या दूतावासाने भारताच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला याबाबत एक पत्रदेखील लिहिले आहे. केंद्रीय मंत्री आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या या पत्रात म्हटलंय की, “पानिपतमध्ये अहमद शाह अब्दाली यांच्या भूमिकेचे चुकीचे वर्णन केले तर अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. याचा परिणाम दोन्ही देशातील संबंधांवर होईल.” अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत शाइदा अब्दाली यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध मजबूत करण्यासाठी भारतीय सिनेमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे असा आपल्याकडे इतिहास आहे. पानिपतने सिनेमा या दोन्ही देशाच्या इतिहासाची ही गोष्ट लक्षात ठेवली असेल अशी मी अपेक्षा करतो.”

अफगाणिस्तानमध्ये अहमद शाह अब्दालीला राष्ट्रपिता मानलं जातं. पानिपत ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक अपगाणी नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अहमद शाह अब्दाली यांना क्रूर, नकारात्मक अंस दाखवण्यात आलं तर अफगाणिस्तान ते खपवून घेणार आहे असा इशाराही काही नेटीझन्सने दिला आहे.

1761 मध्ये पानिपतचं युद्ध झालं. भारताच्या इतिहासात हे युद्ध खूप महत्त्वाचं युद्ध मानलं जातं. याची गाथा सांगणारा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पानिपत सिनेमात संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारली आहे. या सिनेमात अर्जुन कपूर, कृती सेनन प्रमुख भूमिकेत आहे.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

You might also like