काबूलमध्ये भीषण स्फोट 20 मृत्यूमुखी, अनेक पत्रकारांचा समावेश

काबूल : वृत्तसंस्था

अफगाणिस्तानची राजधीनी काबूल आज (30 एप्रिल) पुन्हा दोन शक्तीशाली स्फोटांनी हादरली. या भीषण स्फोटांमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. शहरात पहिला स्फोट स्थानिक वेळेनुसार आज सकाळी 8 वाजता झाला. तर दुसरा स्फोट 20 मिटिटांनंतर त्याच ठिकाणी झाला. एका आत्मघातकी मोटारसायकलस्वाराने स्वतः ला नॅशनल डायरेक्टर आॅफ सिक्युरिटी (एनडीएस) विभागाच्या बाहेर उडवलं.

दुसऱ्या स्फोटामध्ये जास्त जीवितहानी झाली असून, मृतांमध्ये मिडियाचे प्रतिनिधी आणि एनडीएस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते आहे. त्यामध्ये एएफपीचे वरिष्ठ फोटोग्राफर शाह मराई यांचा स्फोटात मृत्यू झाला आहे. हे सर्व पत्रकार रिपोर्टिंगसाठी घटनास्थळी उपस्थित असताना दुसरा स्फोट झाला. अद्याप कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी हा आत्मघाती हल्लाच आहे असे काबूल पोलिसांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. तसेच गृहमंत्रालयाचे प्रवक्ते नजीब दानिश यांनीही हल्ल्याला दुजोरा दिला आहे.

You might also like