Afghanistan | तालिबानने दानिश सिद्दीकीला जिवंत पकडले आणि नंतर निर्दयीपणे केली हत्या, अमेरिकन मॅगझीनमध्ये दावा

नवी दिल्ली : Afghanistan | पुलित्जर पुरस्कार विजेता भारतीय फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांचा अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये गोळीबारात मृत्यू झालेला नसून तालिबान (Taliban) ने त्यांची ओळख पटल्यानंतर अतिशय क्रुरपणे हत्या (brutally murdered) केली होती. अमेरिकेच्या मॅगझीन (American magazine) ने गुरुवारी प्रकाशित एका रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे. 38 वर्षीय दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमध्ये असायनमेंटवर होते, जेव्हा ते मारले गेले. त्यांचा कंधार (Kandahar) शहरातील स्पिन बोल्डक (Spin Boldak) जिल्ह्यात अफगाण सैनिक (Afghanistan soldiers) आणि तालिबान (Taliban) मधील संघर्ष कव्हर करताना मृत्यू झाला होता.

Afghanistan | indian photojournalist danish siddiqui was brutally murdered by taliban us magazine claims

युद्ध कव्हर करत होते

‘वॉशिग्टन एक्झामिनर’च्या रिपोर्टनुसार दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांनी अफगाण नॅशनल आर्मीच्या टीमसोबत स्पिन बोल्डक परिसरात प्रवास केला जेणेकरून पाकिस्तान लगतच्या सीमा क्रॉसिंगवर नियंत्रणासाठी अफगाण दले आणि तालिबानमधील सुरू असलेले युद्ध कव्हर करता येईल.

खबर मिळताच केला हल्ला

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या हल्ल्यादरम्यान दानिश सिद्दीकी यांना छर्रे लागले आणि यासाठी ते आणि त्यांची टीम एका स्थानिक मशिदीत गेले, जिथे त्यांना प्राथमिक उपचार मिळाले. मात्र, एक पत्रकार मशिदीत असल्याचे खबर मिळताच तालिबानने हल्ला केला. स्थानिक तपासात समजले की, तालिबानने दानिश सिद्दीकीच्या उपस्थितीमुळेच मशिदीवर हल्ला केला होता.

ओळख पटल्यानंतर केली हत्या

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, दानिश सिद्दीकी त्यावेळी जिवंत होते, जेव्हा तालिबानने त्यांना पकडले. तालिबानने दानिश सिद्दीकी यांची ओळख पटवली आणि नंतर त्यांना आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनाही ठार मारले. कमांडर आणि त्यांच्या टीमच्या इतर सदस्यांचा सुद्धा मृत्यू झाला, कारण त्यांनी सिद्दीकी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता.

अगोदर मृतदेहाचा चेहरा होता सुस्थितीत

अमेरिकन इंटरप्राईज इन्स्टीट्यूटमध्ये सिनियर फेलो मायकल रूबीन यांनी लिहिले आहे की, व्यापक प्रकारे प्रसारित एका छायाचित्रात दानिश सिद्दीकी यांचा चेहरा ओळखण्यायोग्य दाखवण्यात आला आहे, मात्र भारत सरकारच्या एका सूत्राकडून मला मिळालेली दुसरी छायाचित्रे आणि सिद्दीकी यांच्या मृतदेहाच्या व्हिडिओचे अवलोकन केले, ज्यामध्ये दिसले की तालिबानने सिद्दीकी यांच्या डोक्यावर हल्ला केला आणि नंतर त्यांना गोळ्या मारण्यात आल्या.

मृतदेहाची विटंबना केली

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, तालिबानने हल्ला करणे, सिद्दीकी यांना मारणे आणि नंतर त्यांच्या
मृतदेहाची विटंबना करण्याचा निर्णय हे दर्शवतो की, ते युद्ध नियम आणि जागतिक संधीचा सन्मान
करत नाहीत. दानिश सिद्दीकी यांचा मृतदेह 18 जुलैच्या सायंकाळी दिल्ली एयरपोर्टवर आणण्यात
आला आणि जामिया मिल्लिया इस्लामिया के कब्रस्तानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे देखील वाचा

Tokyo Olympics | बॉक्सिंगमधून भारतीयांना खुशखबर ! लोव्हलिना बोगोर्हेनने केले पदक निश्चित

PM Kisan | आता ‘या’ शेतकर्‍यांवर कारवाईची तयारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ; परत करावी लागेल रक्कम

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Afghanistan | indian photojournalist danish siddiqui was brutally murdered by taliban us magazine claims

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update