‘महानायक’ अमिताभसह 11 सेलेब्सला ‘कोरोना’ झाल्यानंतर आता अभिनेता करण आनंदनं व्यक्त केली चिंता ! लोकांना केलं ‘हे’ आवाहन

शनिवारी रात्री जेव्हा देशातील सर्वात मोठे फिल्मस्टार अमिताभ बच्चन यांनी घोषणा केली की ते कोरोनोव्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले तेव्हा हा प्राणघातक विषाणू किती असुरक्षित असू शकतो याची कल्पना आली. ही बातमी समोर येताच संपूर्ण भारत हादरला. याशिवाय अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, अनुपम खेर यांचे कुटुंब, टीव्ही अभिनेता पार्थ समथान यासारख्या अनेक नामांकित सेलिब्रिटींनाही कोरोनव्हायरसची लागण झाली आहे. तेव्हापासून मित्र आणि नातेवाईक, चाहते त्यांची विचारपूस करत आहेत. परंतु या घटनेनंतर प्रत्येकाच्या मनात एक चिंता निर्माण झाली आहे की जेव्हा या मोठ्या सेलिब्रिटींना हा विषाणू पकडू शकतो, तर सर्व सामान्यांना सुद्धा कोविड – १९ ने हानी होऊ शकते आणि हे खतरनाक ठरू शकतं. आतापर्यंत कोरोनाव्हायरस प्रकरणात अमेरिका आणि ब्राझील नंतर भारत पूर्ण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अभिनेता करण आनंद यानं सोशल मीडियावर कोरोनाव्हायरसवरील वाढत्या हल्ल्याबद्दल आपले विचार व्यक्त केले आणि आपले मन शांत ठेवून याचा सामना कसा केला जाऊ शकतो यावर भाष्य केलं आहे.

करण आनंद यानं ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यानं लिहिलं की, “आपल्या देशात कोविडची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंबीय, अनुपम खेर यांचे कुटुंब, सर्व कोरोनाव्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. आता सर्व प्रकारच्या सुरक्षा उपायांचा वापर करायला लागेल अशी वेळ आली आहे. या घटनेमुळे आमची सिस्टम कुठेतरी चुकत आहे हे आम्हाला पटवून देत आहे.”

करण आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो, “हे सर्व लक्षात घेऊन माझा विश्वास आहे की आपण स्वतःहून काही कठोर पावले उचलली पाहिजेत. समजा तुम्ही जर आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटत असाल तर यावेळी आपल्याला प्रत्येक प्रतिबंधात्मक उपाय करावा लागेल, म्हणजे आपण त्यांना भावनेच्या भरात मिठी मारण्याची गरज नाही, किंवा कोणत्याही प्रकारे त्यांना स्पर्श करू नये. सामाजिक अंतराचे तसेच सुरक्षितता मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करा. तरच आम्ही कोरोना नावाच्या या भयानक आजाराविरूद्ध ठामपणे उभे राहू.”

करणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं गुंडे, किक कॅलेंडर गर्ल्स, बेबी अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. ‘लूट’ मध्येदेखील त्यानं मुख्य भूमिका साकारली होती. 2019 च्या ‘रंगीला राजा’ सिनेमात त्यानं साकारलेल्या युवराजच्या भूमिकेला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळालं. त्याच्या या यशानंतर त्याला कित्येक ऑफर्स आल्या आहेत. ज्यांचा तो विचार करीत आहे.