‘८६ च्या’ आशाताई ‘८२ च्या’ वहिदा रेहमान यांच्यासाठी गाणार ५० वर्षानंतर !

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन –‘पान खायो सय्या हमार’ हे प्रसिद्ध गाणे आशाताईं भोसले यांनी वहिदा रेहमान यांच्यासाठी गायले होते. आता पुन्हा एकदा ८६ वर्षांच्या आशाताई, ८२ वर्षांच्या वहिदा रेहमान यांच्यासाठी तब्बल पन्नास वर्षानंतर “मा की रसोई ” या गीतासाठी गाणे गाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले न्युट्रिशन पार्क गुजरात राज्यातील केवाडिया येथे साकारत आहे . या पार्कमध्ये मुलांसाठी म्हणून खास विविध स्थानके असतील. या प्रत्येक स्थानकावर मुलांची छोटी रेल्वे थांबून तिथे असलेले खेळ,दूध नगरी, फलाहार, विज्ञान,अशा विविध विभागांत त्या-त्या संदर्भात मनोरंजनातून मुलांना माहिती दिली जाणार आहे. या सर्व विभागांसाठी क्रिएटीव्ह दिग्दर्शक म्हणून व या प्रकल्पातील एक महत्त्वाचा विभाग असलेल्या ‘मा की रसोई ’ साठी मराठी चित्रपट निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी हिंदी गीत लिहिले आहे . प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांनी गायिले आहे. या गाण्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान आज्जीच्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळतील.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like