मोदी सरकारचं ‘भ्रष्ट’ अधिकाऱ्यांवर ‘स्ट्राईक’ ; IAS, IPS सह देशातील ‘५ डझन’ वरिष्ठ अधिकार्‍यांना घरचा रस्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन टप्प्यांतील कारवाईत २७ आयआरएस अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर मोदी सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांची तिसरी यादी तयार केली आहे. या यादीत ५० ते ६० अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्यावरही लवकरच बडतर्फीची कारवाई केली जाणार असल्याचे समजते.
प्राप्त माहितीनुसार, तिसऱ्या यादीत आयएएस, आयपीएस आणि इतर सेवांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील काही अधिकारी सरकारी मालकीच्या कंपन्यांतील आहेत.

केंद्रीय दक्षता आयोगाने कारवाईची शिफारस केली असतानाही कित्येक वर्षांपासून या अधिकाऱ्यांच्या फायलींवर धूळ साचलेली आहे. २७ आयआरएस आणि सीमा शुल्क व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या फायली कित्येक वर्षांपासून प्रलंबित होत्या. मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीसाठी १०० दिवसांची कार्यक्रम पत्रिका तयार करताना मंत्र्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील प्रलंबित कारवाईचा विषय सुचविला आणि तो स्वीकारला गेला.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना सहन केले जाणार नाही, असा संदेश मोदी सरकार देऊ इच्छित आहे. पहिल्या कार्यकाळात मोदींनी आपल्या मंत्र्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप होणार नाहीत, याची काळजी घेतली. आता त्यांनी अधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असलेल्या कार्मिक विभागाने आता या फायली बाहेर काढल्या आहेत. पंतप्रधानांप्रमाणेच कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे राज्यंमत्री जितेंद्रसिंग, तसेच गृहमंत्री अमित शहा हे या कारवाईवर जातीने लक्ष देत आहेत. कारवाईला गती देण्यासाठी एका सेलची स्थापना करण्यात आली आहे.

मूलभूत नियम ५६ (जे) (१), केंद्रीय नागरी सेवा कायदा (निवृत्त वेतन) १९७२ च्या नियम ४८ आणि ५६(जे) नुसार ज्या अधिकाऱ्यांना मुदतीपूर्वी सक्तीने निवृत्त केले जाऊ शकते, अशा अधिकाऱ्यांची यादी सादर करण्याच्या सूचना कार्मिक व प्रशिक्षण विभागाने सर्व मंत्रालयांच्या व विभागांच्या सचिवांना दिल्या आहेत.
हे नियम आतापर्यंत अभावानेच वापरले गेले आहेत. या नियमानुसार ५० वर्षांवरील अधिकाऱ्यांना निवृत्तीवेतनाचे लाभ नाकारले जात नाहीत, त्यामुळे त्याविरुद्ध अपील केले जाऊ शकत नाही.

आरोग्य विषयक वृत्त – 

मधमाशी चावल्यावर वेदना कमी होण्यासाठी करा ‘हे’ उपाय

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

एक लिंबू ठरते आरोग्यासाठी फायदेशीर