कल्याणसह पुण्यात हि मोदींची भाषणाची मराठीत सुरुवात 

बालेवाडी (पुणे ) : पोलीसनामा ऑनलाईन – शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग तीनचे भूमिपूजन आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्या प्रसंगी केलेल्या मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीत करून उपस्थितांची मने जिंकली आहेत. मोदींनी कल्याणमध्ये हि मराठीत भाषणाची सुरुवात करून महाराष्ट्रातील थोर पुरुषांची नावे घेऊन महाराष्ट्रातील लोकांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्याच्या सभेत मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे यांची नावे घेत मोदींनी पुणेकरांना सुखद धक्का दिला तर मराठीच बाळासाहेब ठाकरे यांचे  नाव घेऊन नाराज शिवसेनेला गोंजरण्याचा प्रयत्न केला.

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते पार पडले असून मोदींचा कार्यक्रम वेळेत सुरु करून पुणेकरांना आयोजकांनी सुखद धक्काच दिला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर , केंद्रीय नगरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी ,मंत्री गिरीश बापट आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या सहित पुण्याचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेला जनसागर पाहून मोदींनी तुम्ही मला एवढ्या मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देण्यासाठी आलात हे पाहून मला आनंद झाला. तसेच तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो असे मोदी म्हणाले.

मोदी सरकार केंद्रात आल्याने देशाचा कसा विकास झाला याचा मोदींनी सर्वांपुढे पाढा वाचून काढला तसेच आपण सत्तेत आल्या मुळे भारत हा जगातील दुसऱ्या नंबरचा मोबाईल उत्पादक देश बनला असून आज देशात १०० मोबाईल कंपन्या देशात अस्तित्वात असून काँग्रेसच्या काळात फक्त २ कंपन्या देशात होत्या असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला आहे.  मोदींनी त्यांच्या डिजिटल  इंडियाच्या संकल्पाबद्दल उपस्थितांशी संवाद साधला आहे. त्यात ते म्हणाले भारतातील सव्वा लाख ग्रामपंचायत वायफाय युक्त केल्या आहेत, दीड  लाख पोस्ट ऑफिस डिजिटल आणि आधुनिक बनवली आहेत तर ७०० रेल्वे स्टेशनवर वायफाय सेवा सामान्य लोकांना प्रधान केली आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

अटलजींची आठवण काढून मोदी म्हणाले कि देशाच्या मेट्रोचा पाया अटलजींच्या सरकारने घातला होता. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना दिल्लीची मेट्रो सुरु करण्यात आली होती. तेव्हा देशाच्या जनतेने  अटलजींना  एक संधी दिली असती तर आज  महाराष्ट्राच्या अनेक शहरात मेट्रो सुरु झाली असती असे मोदी म्हणाले. तर  महाराष्ट्राचे सरकार हि  मेट्रोवर चांगले काम करत असून येत्या काळात महाराष्ट्र्र राज्यात २०० किमी मेट्रोचे जाळे उभे केले जाणार आहे.