Coronavirus : लॉकडाऊन नंतर ‘स्वस्त’ झाले ड्राय फ्रुट, 20 टक्क्यांनी किंमती घसरल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि चीनमधील सध्याच्या निकालाचा परिणाम म्हणा किंवा लॉकडाऊनमुळे मागणी कमी झाल्याने बाजारपेठांमध्ये ड्राय फ्रुटच्या किंमती गेल्या तीन महिन्यांत 20 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मग ते बदाम, काजू किंवा पिस्ता असो. अशावेळी इतर गोष्टींच्या किंमती वाढण्याची बातमी येत असताना पौष्टिक मूल्याच्या बाबतीत सर्वात महाग असणारे बदाम आणि इतर ड्रायफ्रूट्स 200 रुपये प्रति किलोपर्यंत स्वस्त झाले आहेत. फेडरेशन ऑफ ग्रोसरी अँड ड्रायफ्रूट कमर्शियल असोसिएशन (अमृतसर) चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मेहरा यांनी सांगितले की, “काजू, पिस्ता किंवा खारीकअसो, सर्व ड्राय फ्रुटच्या किंमती घसरल्या आहेत. परंतु अमेरिकन बदाम गिरीमध्ये सर्वाधिक घट झाली आहे.

त्यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी चांगल्या प्रतीचे बदाम गिरी 700 रुपये प्रतिकिलो होते, आता ते 550 रुपये किंवा त्याहूनही कमी झाले आहेत. जयपूरमधील दिल्ली ट्रेडिंग कंपनीचे शैलेंद्र भाटिया यांच्या मते, “घाऊक बाजारात 15 ते 20 टक्क्यांनी किंमती कमी झाल्या आहेत. चांगल्या दर्जाचे बदाम जे 690 ते 800 रुपये होते, ते आता 500 ते 700 रुपये किलो विकत आहे. त्याचप्रमाणे काजूचे चार तुकडा 550 रुपयांवरून 400 रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. पिस्ताबद्दल सांगायचे तर चांगल्या प्रतीचा पिस्ता जो 1200 रुपये असायचा, आता प्रति किलो 1000 रुपयांपर्यंत विकली जात असून ती 200 रुपयांनी घसरली आहे.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ड्राय फ्रुटमध्ये सर्वाधिक घट बदाम, काजू आणि पिस्तामध्ये झाली आहे. तर अक्रोड, अंजीर, मनुका यासारख्या इतर ड्राय फ्रुटच्या किंमतीत फारसा फरक नाही. व्यापाऱ्यांचा विश्वास आहे की, किंमतीतील मोठ्या कपातीमागील प्रमुख कारण म्हणजे लॉकडाऊन. मेहरा यांच्या म्हणण्यानुसार दोन महिने बाजार बंद असल्याने आयात केलेला माल विकू शकला नाही. मागणी-पुरवठ्याचे समीकरण बिघडल्याने किंमती खाली आल्या आहेत.

ड्राय फ्रुटचा सर्वाधिक वापर मिठाई, हॉटेल उद्योग, शाही विवाहात होतो. त्यांचे म्हणणे होते कि, लॉकडाऊनमुळे दोन महिन्यापर्यंत ना मिठाई बनविली गेली, ना हॉटेलं उघडली आणि ना ही लग्न- समारंभ झाली, त्यामुळे ड्राय फ्रुटची व्रिक्री झाली नाही. दरम्यान, बदाम आणि मनुका वगळता इतर ड्राय फ्रुटस गरम असतात, म्हणून ते हिवाळ्यात अधिक खाल्ले जातात. उन्हाळ्यात मिठाई, आईस्क्रीम उद्योगात त्यांचा जास्त वापर केला जातो.

जयपूर किराणा व ड्रायफ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष प्रल्हाद अग्रवाल यांच्या मते, बदाम गिरीच्या किंमतीतील घट होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेला वाद. अमेरिकन बदामांचे दोन मोठे आयातदार म्हणजे चीन आणि भारत. कोरोना विषाणूच्या संसर्गासंदर्भात अमेरिकेने चीनवर निशाणा साधल्यानंतर आता चीन त्याच्याकडून बदाम विकत घेत नाही, त्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेतही त्याचे दर घसरले आहेत. मेहराच्या म्हणण्यानुसार, कॅलिफोर्नियामध्ये बदाम गिरीची किंमत प्रति पौंड 2.35 डॉलरवरून 1.50 डॉलर इतके खाली आले आहेत, ज्यामुळे देशांतर्गत बाजारातील किंमतीही कमी झाल्या आहेत. जोपर्यंत विक्रीचा प्रश्न आहे शैलेंद्र भाटिया यांच्या मते, दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे विक्री झाली नाही आणि अजूनही 20-25 टक्केच विक्री चालू आहे. चंद्रशेखर मालपाणी या दुसर्‍या व्यावसायिकाच्या मते, लॉकडाउन व ऑफ सीझनमुळे ड्राय फ्रूट्सची विक्री निम्म्याने खाली आली आहे.