‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत लग्नानंतर एकटीच जाणार ‘हनीमून’ला (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंतच्या लग्नाची चर्चा आहे. परंतु चाहत्यांना याबाबत अजून खात्री नाही की, तिने खरंच लग्न केलं आहे. कारण तिचा पती अद्याप मीडियासमोर आलेला नाही. राखीचं म्हणणं आहे की, ती एकटीच लंडनला हनीमूनसाठी जात आहे. राखीने स्वत: याबाबत व्हिडीओ शेअर केला आहे.

राखी व्हिडीओत म्हणत आहे की, “मी खूप खुश आहे की, मी एकटीच आता लंडन, बर्मिंघम आणि माहीत नाही कुठे कुठे जाणार आहे. मी हनीमूनसाठी जात आहे. परंतु मी एकटीच जात आहे.”

राखी म्हणते की, “मी कंगना रणौतचा क्वीन सिनेमा पाहिला आहे. त्यात कंगना एकटीच हनीमूनला जाते. त्यामुळे मीही एकटीच हनीमूनला जाणार आहे. खूप मजा येणार आहे. मी तिकडे खूप फिरणार आहे.” राखी एकटीच हनीमूनला जाण्यात किती तथ्य आहे आणि तिच्या लग्नातही किती तथ्य आहे हे तिचा पती मीडियासमोर येईपर्यंत स्पष्ट होणार नाही. परंतु लग्नाच्या एपिसोडमुळे राखी मात्र चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. तिला खूप प्रसिद्धी मिळत आहे.

राखीच्या व्हिडीओवर अनेक गमतीशीर कमेंट्स येत आहेत. एक युजर म्हणतो की, “राखी कंगनाचं सिनेमात लग्न झालं नव्हतं. तुझं तर झाले आहे ना. तर हे एकसारखंच कसं आहे.” आणखी एक युजर म्हणतो की, “परंतु तू कोणासोबत हनीमून साजरा करणार?” एकाने चिमटा काढत म्हटले आहे की, “लग्न झालं नाही तर एकटीच जाणार ना… नौटंकी क्वीन.” एकाने विनोदी कमेंट करत म्हटले की, “किती वेडे चाळे करतेस दीदी. बस कर आता रडवतेस का?

राखीने 28 जुलै रोजी मुंबईतील हॉटेलमध्ये गुपचूप लग्न केलं होतं. तिच्या पतीचं नाव रितेश आहे. तिने सांगितले आहे की, पती रितेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कंपनीत काम करतो.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like