‘रामायण’नंतर आता ‘श्री कृष्णा’ला मिळतंय लोकांचं भरभरून ‘प्रेम’, TRP च्या यादीत घेतली जोरदार ‘एन्ट्री’

पोलिसनामा ऑनलाइन –दूरदर्शनवरील धार्मिक मालिकांना लोकांचं भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे. बार्कनं 18 व्या आठवड्याची टीआरपी रेटींग जारी केली आहे. रामायण आणि महाभारतनंतर आता श्री कृष्णा या मालिकेनं टीआरपीच्या यादीत जोरदार एन्ट्री घेतली आहे. सर्वदमन बॅनर्जी यांनी या मालिकेत कृष्णा आणि विष्णुची भूमिका साकारली आहे. लोकांना ही मालिका खूप आवडत आहे.

बार्कच्या 18 व्या आठवड्यातील टीआरपीमध्ये उत्तर रामायण पहिल्या नंबरवर आहे. दुसऱ्या नंबरवर आहे श्री कृष्णा. ही मालिका देखील रामानंद सागर यांनीच तयार केली आहे. 1993 ते 1996 च्या काळात ही मालिका दूरदर्शनवर टेलीकास्ट केली जायची. बी आर चोपडांची महाभारत मालिका 17 आठवड्यात दुसऱ्या नंबरवर होती ती आता तिसऱ्या नंबरवर गेली आहे.

महाभारतमधील शेवटचा एपिसोड अलीकडेच प्रसारीत झाला आहे. डीडी भारतीवर आता येणाऱ्या विष्णु पुराणचं प्रसारण केलं जाणार आहे.

श्री कृष्णा मालिका टॉप 5 मध्ये आल्यानंतर आता इतर मालिकांचा टीआरपी घसरला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर असणारा शो बाबा ऐसो वर ढुंढो चौथ्या क्रमांकावर गेला आहे.

याशिवाय लोकांचा फेवरेट शो महिमा शनिदेव की चौथ्या नंबरवरून पाचव्या नंबरवर गेला आहे. दया शंकर पांडेनं या मालिकेत शनिदेवाची भूमिका साकारली आहे.