बायको गेली माहेरी ‘त्याने’ मुलीवर बलात्कार करुन केली तिची हत्या

बिजनौर : वृत्तसंस्था – बलात्कार आणि हत्येच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच आहेत. काही केल्या या गोष्टींना आळा बसत नाही. समाजात मुली सुरक्षित नाहीत असंही नेहमी म्हटलं जातं. परंतु जर रक्षकच आता भक्षक झाला तर काय करणार ? आता स्वत:च्या राहत्या घरातच जर मुलगी सुरक्षित नसेल तर मुलीने काय करावं ? एक अतिशय धक्कादायक आणि अविश्वसनीय प्रकार समोर आला आहे. स्वत:च्या वडिलांनीच मुली बलात्कार केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब अशी की, तिची हत्याही केली. बायको माहेरी गेल्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. गुरमेर असं या आरोपीचं नाव आहे.
बिजनौर जिल्ह्यातील ही घटना आहे. बिजनौर जिल्ह्यातील खादर गावामध्ये शनिवारी एका व्यक्तिने 12 वर्षाच्या सावत्र मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. बायकोने आपल्या 3 मुलांना  तिच्या सावत्र वडीलांकडे सोडून माहेरी गेली होती. आदेश असं या महिलेचं नाव आहे. शनिवारी रात्री गुरमेरने आदेशची मुलं (रौनक आणि शुभम) यांना एका खोलीत आणि अल्पवयीन मुलीला वेगळ्या खोलीत झोपायला पाठवलं. आणि रात्री त्याने 12 वर्षाच्या सावत्र मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली.  पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
काय आहे नेमकी घटना ?
मध्यरात्रीच्या सुमारास  सर्वजण झोपल्यावर गुरमेरने सावत्र मुलीसोवर बलात्कार केला. दरम्यान ही मुलगी सदर प्रकार आपल्या आईला सांगेल अशी भीती त्याला वाटू लागली. इतकेच नाही तर बदनामी होणार या भितीने गुरमेरने  मुलीची गळा दाबून हत्या केली. ही बातमी शेजारी राहणाऱ्यांपर्यंत ही बातमी पसरली. त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावून घेतलं. पोलिसांनी गुरमेरची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. आदेश हिच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर ती गुरमेरसोबत राहत होती.
याआधी अशीच घटना  
याआधी उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातही पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून एका व्यक्तिवर बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. आश्चर्यकारक म्हणजे या प्रकरणातील पीडितेची आई असलेल्या आदेशच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती. 15 जुलैला अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार केल्याची घटना समोर आल्याचे कोतवाली कर्वीचे निरीक्षक अनिल सिंह यांनी सांगितलं. मुलीचे किंचाळणे ऐकून आई घरात पोहोचली तेव्हा बाप जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून फरार झाला होता.