शिवा संघटनेच्या लढ्यामुळे बीड जिल्ह्यातील कपीलधार हरितक्रांतीच्या दिशेने

बीड : पाेलीसनामा ऑनलाईन

समस्त लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र कपीलधारची (जि.बीड) वाटचाल हरितक्रांतीच्या दिशेने होत असून लवकरच जवळपास 1500वर बेल आणि रुद्राक्ष या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. दरम्यान श्रीक्षेत्र कपीलधारचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी वेळोवेळी या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. हे या लढ्याचे यश असून याचे श्रेय शिवा संघटनेला दिले जाते. ही माहिती शिवा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर यांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2237f3ba-c7cf-11e8-b1bf-c5c4bf3f5625′]

याबाबत प्राप्त माहिती अशी की, वनविभागाच्या वतीने जवळपास दिड हजारावर बेल व रुद्राक्ष या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. शिवा संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात येत असून हे शिवा संघटनेचे यश मानले जात आहे. शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या कुशल नेतृत्व व योग्य नियोजनामुळे कपीलधार क्षेत्री आनंदवन प्रस्थापित होणार असल्याची माहिती शिवा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर यांनी प्रसारमाध्यमांना कळवली आहे.

बेल, रुद्राक्ष, वड, पिंपळ असे जवळपास एकुण अडीच हजार वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली असून सोमवारी 125 वृक्ष लागवड शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर, अशोक ढोले, गोकुळ साळुखे, भास्कर ढेरे, उस्मान निजाम पठान, एकनाथ साळुखे सह वनविभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत पुर्ण झाली आहे.
[amazon_link asins=’B01N407G2I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a0de023-c7cf-11e8-a2b8-494f3bcc8e9a’]

कपीलधार क्षेत्र हरितीकरण करण्यासाठी पाठपुरावा करणार- सचिन शहागडकर

बेल व रुद्राक्ष लागवडीचे काम जिल्हा वार्षिक योजनेतून चालू आहे. वृक्षांचे संरक्षण व संगोपणासाठी कंपाऊंडही करण्यात येणार आहे. पाण्यासाठी बाजूच्या तळ्यावरुन स्वतंत्र पाईपलाईनही करण्यात आली आहे. कपीलधार हे क्षेत्र वन क्षेत्रात येत नसून महसुल गायरान विभागात येते. सदर क्षेत्राची हरितीकरण करण्यासाठी वनविभागास स्वतंत्र निधी मिळण्यासाठी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार असल्याचे मत जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर यांनी व्यक्त केले आहे.
[amazon_link asins=’B07C8KJBRY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’321f265a-c7cf-11e8-8033-c9e7bbafe4c8′]

10 एकर क्षेत्रात होणार ‘शिवा वन’

कपीलधार हे जिल्ह्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ असून त्यालगत महसूल खात्याच्या ताब्यातील गायरान क्षेत्र आहे. मा.वनमंत्री महोदयांच्या आदेशानूसार येथील 10 एकर क्षेत्रावर ‘शिवा वन’ विकसित करण्यात येत आहे. परंतू सदर संपूर्ण परिसर हरित करुन या स्थळाच्या वैभवात भर घालण्यासाठी सदर परिसर वनविभागाकडे हस्तांतरित करणे व त्यासाठी भरीव निधी मिळाणे आवश्यक आहे.

हुश्श ….! इंधनाच्या दरात ५ रुपयांची कपात