आरटीओच्या रिकाम्या खुर्ची समोर बसून ट्रक चालक, मालकांचे ठिय्या आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोशिएशन चालक, मालक संघटनेच्या वतीने बुधवारी दुपारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी.के.तडवी यांचे दालनात पदाधिकारी, कार्यकर्ते एकञ जमत रिकाम्या खुर्ची समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी ट्रक मालकांनी ट्रकला जीपीआरएस यंञणा लावावी असा आदेश तडवी यांनी दिला होता. संघटनेलाही तो मान्य आहे. परंतू लेखी आदेश संघटनेला प्राप्त नाही. अन्य अधिकारी व कर्मचारी याच बाबींना धरुन अडवणूक करत लुट करत आहे ती थांबवी.

तडवी यांना वेळोवेळी निवेदन दिली तरी ते दखल घेत नाही. अन्य बाबीकडे दुर्लक्ष करतात, यामुळे संतप्त होते. हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरु असताना सहकारी अधिकारी पवार यांनी मोबाईल द्वारे माहिती देताच जीपीआरएस यंञणेला मी होकार दिला आहे. सांगत मोबाईल बंद केला. कार्यालयात या लेखी द्या यावर आंदोलन करते ठाम होते.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की तडवी हे कार्यालयात कमी घरीच जास्त वेळ असतात. कार्यालयात खुर्चीचे तोंड हि भिंती कडे असते. खुर्ची उलटी केलेली असते. या अधिकारी याला कामकाज करुन प्रश्न सोडवायचे नसतील तर शासनाने लक्ष देत याला घरी बसावे. अन्य चांगल्या अधिकारीची नियुक्ती करावी. लवकरच जिल्हाधिकारी रेखावार यांना भेटून निवेदन देणार आहे. प्रश्न मार्गी न लागल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा संतप्त इशारा उत्तर महाराष्ट्र ट्रक अोनर्स असोशिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

मदरशातील मुलींवर लैंगिक अत्याचार, व्यवस्थापकासह तिघांना अटक

न्यायाधीशांच पंतप्रधानांना पत्र, न्यायव्यवस्थेत घराणेशाही आणि जातीवाद,