Agra-Mumbai Highway | SUV गाडीचा भीषण अपघात, 3 पोलिसांसह चार ठार

ग्वालेर : वृत्तसंस्था –  Agra-Mumbai Highway | भरधाव वेगात जाणाऱ्या एसयुव्ही (SUV) गाडी ट्रकला धडकून झालेल्या भीषण अपघातात (Terrible Accident) तीन पोलीस कर्मचाऱ्यासह एकाचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) आग्रा-मुंबई महामार्गावर (Agra-Mumbai Highway) मोरेना येथे पाहाटे चारच्या सुमारास झाला. अपघातात गाडी चालकाचा देखील समावेश आहे. तर अन्य एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

आग्रा-मुंबई महामार्गावर  पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
ठार झालेले पोलीस कर्मचारी अलिगड (Aligarh) येथील असून ते ग्वाल्हेरला (Gwalior) निघाले होते.
वाटेत बनमोरे औद्योगिक वसाहतीजवळ (Banmore Industrial Estate) हा अपघात झाला.
हे चार पोलीस कर्मचारी एका खासगी गाडीतून ग्वाल्हेरच्या दिशेने जात होते.
त्यात एक पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि तीन कॉन्स्टेबल्सचा (Constable) समावेश होता.

भरधाव वेगात असलेल्या एसयुव्हीची धडक समोरच्या ट्रकला बसली. यामध्ये चार जण ठार झाले असून यामध्ये पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे.
जखमी कॉन्स्टेबलला ग्वाल्हेरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Agra-Mumbai Highway)

 

Web Title : Agra-Mumbai Highway | accident four killed including three policemen in a horrific accident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Svamitva Scheme | PM मोदींकडून 1.71 लाख लाभार्थ्यांना ई-प्रॉपर्टी कार्डचं वाटप, पंतप्रधान म्हणाले – ‘आता सरकारकडे गरीबांनी फेर्‍या मारण्याचे युग संपले’

IMD Forecast | भारतातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात

LPG Connection | घरबसल्या करू शकता ‘फ्री एलपीजी गॅस’ कनेक्शनसाठी अर्ज, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?