पुण्यातील ‘अॅग्रो टुरिझम विश्व’ ठरली बेस्ट ई कॉमर्स स्टार्ट अप ऑफ द इयर

पुणे : पोलीसनामा  ऑनलाईन 
सुप्रिया थोरात 
शेती व्यवसाय भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. शेती व्यवसायावर जवळजवळ ८० टक्के लोक अवलंबून आहेत. यापूर्वी शेतमाल हेच शेतीच्या उत्पन्नाचं मुख्य साधन होत, परंतु सध्याच्या काळात शेतीला जोडधंदा  म्हणून “कृषी पर्यटन” व्यवसाय नावारूपाला  येत आहे . शेती व्यवसायाला पर्यटनाची जोड  देऊन उत्पादनात भर घालता येणारा प्रकल्प म्हणजे ‘कृषी पर्यटन’ . मोदी सरकारने सुरु केलेल्या “स्टार्टअप” योजनेत कृषी पर्यटन या व्यवसायाचाही समावेश करण्यात आला आहे . अर्थसंकेत प्रस्तुत ‘डिजिटल इंडिया २०२० कॉनक्लेव्ह’ कार्यक्रमात पुण्यातील एका कंपनीला ‘बेस्ट ई कॉमर्स स्टार्ट अप’ ऑफ द इयर या पुरस्काराने मुबंईत गौरविण्यात आले.

[amazon_link asins=’8193387643,8172344392′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’71be6756-ab7f-11e8-bc08-cf5e9497f4f0′]

पुण्यातील  ‘अॅग्रो टुरिझम विश्व’, या स्टार्टअप कंपनीला ‘बेस्ट ई कॉमर्स स्टार्ट अप’ ऑफ द इयर या पुरस्काराने मुबंईत गौरविण्यात आले. मुंबईतील महाराष्ट्र कॉमर्स ऑफ चेंबर्स येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कंपनीच्या वतीने संस्थापक गणेश चप्पलवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विविध क्षेत्रातील डिजिटल इनोव्हेटिव स्टार्टअप सुरू केलेल्या कंपनीला यावेळी पुरस्काराने सन्मानीत केले गेले.
“कृषी पर्यटन” व्यवसायाविषयी  शेतकर्‍यांमध्ये होणारी जागृती, शेतीपूरक उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे बघितले जात असल्याने दिवसेंदिवस कृषी पर्यटन व्यवसाय चांगलेच मूळ धरून बहरू लागला आहे. या नावारूपास आलेल्या व्यवसायास लोकांची पसंती मिळत आहे तसेच या व्यवसायाला अधिक प्रसिद्धी मिळावी म्हणून  अनेक संस्था ,कंपन्या डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत . त्यापैकीच  मुख्य एक म्हणजे ‘अॅग्रो टुरिझम विश्व’. यात विशेषत: तरुण शेती उद्योजक रस घेताना दिसत आहेत.
महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्रांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन, कृषी केंद्रांची माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देणे. फेसबुक, लिंकडिन, इन्स्टाग्राम, यु ट्यूब, व्हॉट्स अप, इ मेल यांसारख्या माध्यमातून त्यांची जाहिराती, प्रमोट करणे, मार्केटिंग करणे थोडक्यात काय तर कृषी पर्यटन केंद्रांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी पर्यटन विश्वच्या वतीने करण्यात येते . त्यांच्या  या डिजिटल कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

सुप्रिया सुळे यांचे पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन


काय आहे अॅग्रो टुरिझम
शहराच्या धावपळीच्या जीवनातून स्वतःसाठी थोडा वेळ काढत कृषी  पर्यटनाला जाण्याची क्रेझ सध्या वाढलेली आहे. त्यातही हल्ली शहरातील वाढते प्रदूषण आवाज गोंधळ यापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालविण्याकडे हल्ली लोकांचा कल दिसून येतो. आधी फक्त शेतात जेवायला जाणे इतक्यावरच मर्यादित असणाऱ्या  वनभोजनाने आता अॅग्रीकल्चर टुरिझम चे रूप घेतले आहे. वीकेंडला किंवा सुट्ट्या लागून आल्या कि दोन दिवसांची छोटी पिकनिक काढण्यासाठी या स्थळांना पर्यटक पसंती देताना दिसून येत आहेत.