Ahmednagar | संतापजनक ! शेतकर्‍यांकडून पंचनामे करण्यासाठी 400 रुपयांची वसुली, महसूल मंत्री विखेंच्या जिल्ह्यातील प्रकार

नेवासा : Ahmednagar | अतिवृष्टी (Heavy Rain) आणि परतीच्या पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी (Farmer) हवालदिल आणि चिंताग्रस्त झाला आहे. शेतकरी आणि विरोधक ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी करत असताना शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) दुर्लक्ष करत आहे, तर दुसरीकडे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकर्‍यांकडून प्रत्येकी 400 रूपये वसूल केले जात असल्याने संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे शेतकर्‍यांकडून पंचनाम्यासाठी 400 रूपये वसुल करण्याचा प्रकार भाजपा नेते (BJP Leader) आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांच्या जिल्ह्यात घडला आहे. (Ahmednagar)

भाजपा नेते आणि राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी 400 रूपये मागितले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकरी चारशे रुपये मागितले जात आहेत. नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे शेतकर्‍यांकडून पैसे घेतले जात आहे. महसूल विभागाने (Revenue Department) नेमलेल्या पथकाकडून पैशांची मागणी केली जात आहे.

एका सजग शेतकर्‍याने हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेर्‍यात कैद केला आहे. या व्हिडिओत एकरी 400 रुपये मागितले जात आहे. इतकेच नाही तर कर्मचार्‍यांनी आतापर्यंत किती शेतकर्‍यांनी पैसे दिले याची यादीही दाखवत आहे. या चर्चेदरम्यान एका जयश्री नावाच्या अधिकार्‍याचे नाव सुद्धा घेतले जात आहे. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. कामगार तलाठी आणि ग्रामसेवकाकडे कारवाईची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. (Ahmednagar)

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता, त्यावेळी पंचनामे करण्याचे
आदेश दिले होते. पंचनामे झाले नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित असून आता पंचनाम्यासाठी पैसे घेतले
जात असल्याने सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

Web Title :- Ahmednagar | 400 rupees collected from farmers for panchnama revenue minister vikhes district ahamadnagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा