Ahmednagar Crime | तोंडात बोळा कोंबून तरुणीचा खून, अत्याचार झाल्याच्या संशयामुळं संपुर्ण नगर जिल्ह्यात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar Crime) पारनेर तालुक्यातील जवळे गावात एका युवतीचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला आहे. या तरुणीवर अत्याचार करुन तोंडात बोळा कोंबून खून (Murder) केल्याचा संशय आहे. तरुणी घरात एकटीच असताना भर दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे नगर जिल्ह्यात (Ahmednagar Crime) प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील (Parner taluka) जवळे गावाजवळ असलेल्या बारशीले वस्तीवर एक मजूर कुटुंब वास्तव्यास आहे.
पती-पत्नी दोघेही रोजंदारीने कामाला जातात. बुधवारी (दि.21) ते कामाला गेले होते. त्यावेळी त्यांची मुले घरी होती.
दुपारी दीडच्या सुमारास मुलगा क्लासला गेला. त्यावेळी त्याची मोठी बहीण घरात एकटीच होती.

क्लासवरुन मुलगा घरी आला तेव्हा त्याची बहीण घरात निपचित पडली होती. ती प्रतिसाद देत नसल्याचं पाहून त्याने बाहेर येऊन आरडाओरडा केला.
त्याच्या आवाजामुळे परिसरातील लोकांनी घराकडे धाव घेतली. त्यांनी मुलीला जवळच्या एका खासगी रुग्णालयात (private hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषीत केले.

मुलीचा मृतदेह घरात ज्या ठिकाणी पडला होता, त्या ठिकाणी चाकू आणि टॉवेलचा बोळा आढळून आला.
तिला चाकूचा धाक (Ahmednagar Crime) दाखवून, तोंडात बोळा कोंबून तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पोलिसांनी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तिच्यावर अत्याचार (Ahmednagar Crime) झाले की नाही हे समजेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

 

Web Title : Ahmednagar Crime | murder of a young girl in ahmednagar Sensation of atrocities in the entire Nagar district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jumbo Covid Hospital Pune | ‘जंबो कोव्हिड हॉस्पीटल ’ बाबत पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेणार – रविंद्र बिनवडे, अतिरिक्त पुणे महापालिका आयुक्त

Ajit Pawar | आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणास सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

Must Do Before 31 October | 31 ऑक्टोबरपूर्वी ITR फाईल करण्यासोबतच करा ‘ही’ 4 महत्वाची कामे, अन्यथा होईल मोठे नुकसान; जाणून घ्या