Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग कशी लागली? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती; मुख्यमंत्र्यांचे सखोल चौकशीचे आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आज सकाळी आग (Ahmednagar Hospital Fire) लागून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 6 जणांवर उपचार सुरु आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीबाबत (Ahmednagar Hospital Fire) महत्त्वाची माहिती समोर येत आहे. प्राथमिक चौकशी आणि माहितीनुसार प्रथम रुग्णालयातील एसीला (AC) आग लागली, ती आटोक्यात आणण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा बंद (Oxygen supply shut off) करण्यात आला. त्यामुळे काही रुग्णांचा गुदमरुन तर काहींचा दुसरीकडे स्थलांतरीत करत असताना मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी एसीमध्ये लागलेल्या आगीमुळे संपूर्ण अतिदक्षता विभाग (Intensive care unit) जळून खाक झाला आहे.

 

एसीला लागलेल्या आगीमुळे दुर्घटना

 

कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेच्यावेळी खास कोरोना कक्ष तयार करण्यात आला होता.
रुग्ण वाढू लागल्याने त्याचे अतिदक्षता विभागात रुपांतर करण्यात आले.
नाशिक गॅस दुर्घटनेनंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट (Fire audit) करण्यात आले होते. तरीही ही दुर्घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या विभागात 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, या विभागातील एसीला आग लागली.
ती लक्षात आल्यावर हालचाली सुरु झाल्या. परंतु ऑक्सिजन बंद केल्याने आणि तोपर्यंत धूर आणि आग पसरल्याने एकच गोंधळ उडाला.
रुग्णांना तातडीने दुसरीकडे स्थलांतरित करण्यास सुरुवात झाली.
हे सुरु असताना आग भडकली (Ahmednagar Hospital Fire) आणि आत प्रवेश करणे अवघड झाले, अशी घटनेबाबत प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

 

मुख्यमंत्र्यांचे सखोल चौकशीचे आदेश

 

दरम्यान, अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डात आज आग (Ahmednagar Hospital Fire) लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
(CM Uddhav Thackeray) यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्याशी आणि मुख्य सचिव (Chief Secretary)
यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी (inquiry) करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

 

मृतांच्या वारसांना 7 लाखांची मदत

 

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख आणि एनडीआरएफ (NDRF) निधीमधून 2 लाख रुपये अशी एकूण 7 लाख रुपयांची मदत दिली जाईल.
अशी माहिती थोरात यांनी दिली आहे. (Ahmednagar Hospital Fire)

 

Web Title : Ahmednagar Hospital Fire | ahmednagar hospital fire cm uddhav thackeray orders probe into the tragedy fire reason come in front

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Asaram Bapu | जेलमध्ये बंद आसाराम एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल, 5 दिवसांपासून आहे ताप

Pune Crime | राज्य उत्पादन शुल्ककडून पुण्याच्या वारजे परिसरातून 52 लाखांचा मद्यसाठा जप्त, प्रचंड खळबळ

Aryan Khan Drugs Case | ‘सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, तोच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड’ – भाजपचे मोहित कंबोज