AICTE ने हिंदी, मराठीसह 11 प्रादेशिक भाषेत बीटेक अभ्यासक्रमाला दिली मंजूरी – शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली : AICTE News | केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (minister dharmendra pradhan) यांनी शनिवारी म्हटले की, अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद AICTE (एआयसीटीई) ने 11 प्रादेशिक भाषेत बीटेक अभ्यासक्रमाला (b-tech course in 11 regional languages) मंजूरी दिली आहे. या भाषांमध्ये हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, कन्नड़, गुजराती, मल्याळम, बांगला, असामी, पंजाबी आणि उडियाचा समावेश आहे.

प्रधान यांनी ट्विट केले की, एआयसीटीईने 11 प्रादेशिक भाषांमध्ये बीटेक अभ्यासक्रमाला (b-tech course in 11 regional languages) मंजूरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य प्रवाहातील शिक्षणात प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यास प्रतिबद्ध आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण विविध प्रदेशातून येणार्‍या विद्यार्थ्यांना सशक्त करण्यासाठी महत्वाचे काम करत आहे.

तत्पूर्वी, शनिवारी उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आठ राज्यांच्या 14 इंजिनियरिंग कॉलेजांसाठी नवीन शैक्षणिक वर्षपासून निवडक शाखांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करण्याच्या निणर्याचे स्वागत केले.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले, इंजिनियरिंग कॉलेजांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी माननीय उपराष्ट्रपतीचे आभार.

हे देखील वाचा

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 364 नवीन रुग्ण

Nashik Ozar Airport | नाशिक विमानतळाच्या नामांतरासाठी 9 ऑगस्ट रोजी महामोर्चा; पुण्यात झाली सर्व दलीत, पक्ष संघटनांच्या नेत्यांची बैठक

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  AICTE | education minister pradhan said aicte approves b tech course in 11 regional languages

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update