Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 364 नवीन रुग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona) नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात रुग्ण वाढत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे थोडी चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 364 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 331 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 83 हजार 884 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 72 हजार 240 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8690 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुण्यात 2954 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 2954 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 236 रुग्ण गंभीर आहेत. तर 485 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 7058 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे. आतपर्यंत 27 लाख 85 हजार 732 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.36 %
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 70 हजार 285 रुग्णांपैकी 10 लाख 42 हजार 43 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 10 हजार 176 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.36 टक्के आहे.

Web Titel :- Pune Corona | 364 new corona patients in Pune in last 24 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शिवसेनेचे माजी खा. आढळराव पाटलांनी काढली खासदार अमोल कोल्हेंची ‘उंची’, म्हणाले – ‘कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा…’ (व्हिडीओ)

DGP Sanjay Pandey | काय सांगता ! होय, चक्क पोलीस महासंचालकांनी Facebook वरुन दिला Work Report

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक