12 वी परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, केंद्रीय शिक्षणमंत्री AIIMS मध्ये दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना एम्स AIIMS  रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोव्हिडनंतर होणाऱ्या आरोग्यासंदर्भातील तक्रारींमुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज (मंगळवार) CBSE आणि ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षासंदर्भात निर्णय घेतला जाणार होता. मात्र, डॉ. निशंक यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात निशंक यांना कोरोनाची लागण झाली होती.

Supriya Sule : शरद पवारांनी दिलेला दिल्लीबाबतचा ‘तो’ सल्ला कायम लक्षात ठेवते

बारावीच्या परीक्षासंदर्भात 1 जून रोजी निर्णय घेतला जाईल आणि त्यासाठी बैठकही होईल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यापूर्वीच पोखरियाल यांना एम्समध्ये AIIMS दाखल करण्यात आलं आहे. सीबीएसई बोर्डाकडून बारावीच्या परीक्षांबाबत जो काही निर्णय घेतला जाईल त्याचा परिणाम विविध राज्यातील बारावीच्या परीक्षांवर होण्याची शक्यता आहे.

डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी देखील त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांनी शिक्षण मंत्रालयाचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बैठकांमध्ये सहभागी होत होते. दरम्यान, कोरोनानंतर कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, Gold 50000 रूपयांच्या जवळ तर Silver 72 हजारांवर

Health in Your Hands : Corona सह गंभीर आजारांचा संकेत देतात तुमचे हात, असा घ्या शोध

Pune : पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कर्मचारी आणि त्याच्या भावाकडून Covid केअर सेंटरमधील डॉक्टरला चौकीत घुसून मारहाण, प्रचंड खळबळ

Coronavirus Vaccination : कोविड-19 व्हॅक्सीनच्या साईड-इफेक्ट्सपासून आराम देऊ शकते का नारळपाणी?, जाणून घ्या

नारायण राणेंची मराठा समाजासाठी मागणी, म्हणाले – ‘3 हजार कोटींचे पॅकेज द्या’

केमिकल टँकर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू