भारिप आणि एमआयएम राज्यातील निवडणुका एकत्र लढणार

औरंगाबाद :   पोलीसनामा ऑनलाईन

मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) आणि प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ हे राज्यात युती करुन निवडणुका लढणार आहेत. गांधी जयंतीला म्हणजेच २ ऑक्टोबरला औरंगाबादेत जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली एकत्र सभा होणार आहे. प्रकाश आंबेडकर या युतीचं नेतृत्व करणार आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील विविध समाज घटकांशी संबंधित संघटनांची एकत्र मोट बांधून वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी याबाबत माहिती दिली.[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B0146QJTDC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’076e726e-b8b5-11e8-b47c-4d554c241389′]

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढतील. अहमदनगर महापालिकेत युतीचा पहिला प्रयोग केला जाणार आहे . २ ऑक्‍टोबरला सकाळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये युतीची पहिली बैठक घेतली जाईल. यापूर्वी एमआयएम आणि प्रकाश आंबेडकरांच्या भारिपमध्ये युतीबाबत पुण्यातील प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी दोन मीटिंग झाल्या आहेत.राज्यातील दलित आणि मुस्लिमांची मते एकत्रित करण्याचा प्रयत्न या युतीतून केला जाणार आहे. या युतीतून आता मतांचं विभाजन टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

एमआयएमचे राज्यात दोन आमदार आहेत. एमआयएमचे औरंगाबाद महापालिकेत २५ नगरसेवक आहेत. एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच सांगितले होते . एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि बहुजन समाज पार्टीचे दिवंगत नेते कांशीराम यांच्या राजकारणाचा पोत सारखाच असल्याचेही ते म्हणाले होते .

….म्हणून उच्च न्यायालयानेच आयोजित केला कबड्डीचा सामना