Air India : नोकरीची उत्तम संधी ! एअर इंडियात रिक्त पदांवर भरती, 50 हजारांपर्यंत पगार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोना संकटामुळे ठप्प झालेले अनेक उद्योग, क्षेत्र हळूहळू सावरताना दिसत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होत आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्र सरकारची एव्हिएशन कंपनी एअर इंडियामध्ये विविध रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

अकाऊंट्स आणि फायनान्सची शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी रिक्त पदांसाठी भरती सुरु केली आहे. एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेसने विविध पदांवर भरती सुरु केली आहे. जर तुमची निवड झाली तर तुम्हाला देशातील मेट्रो शहरे दिल्ली, मुंबई, चेन्नई अथवा कोलकातामध्ये पोस्टिंग मिळेल. पगार देखील आकर्षक असेल, असे सांगितले जात आहे.

पदांची माहिती आणि वेतन

मॅनेजर (फायनान्स) 4 पदे- 50 हजारापर्यंत मासिक वेतन
ऑफिसर (अकाउंट्स) 7 पदे – 32 हजार 200 रुपयापर्यंत मासिक वेतन
असिस्टंट (अकाउंट्स) 4 पदे – 21 हजार 300 रुपयापर्यंत मासिक वेतन
एकूण 15 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता

सामान्य ग्रॅज्युएट (फायनान्स किंवा अकाउंट्समध्ये किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक) ते एमबीए, सीए इंटर आणि चार्टर्ड अकाउंटंटपर्यंत शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता ते नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहे.

अर्ज कसा करायचा

एअर इंडियाच्या या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. तुमच्याद्वारे जमा केलेले अर्ज स्क्रीनिंग करुन आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अॅप्लिकेशन फॉर्म नोटिफिकेशन लिंकमधून डाऊनलोड करा. प्रिंटआऊट काढा. ते भरुन सॉफ्टकॉपी एअर इंडियाच्या ई-मेल आयडी [email protected] व पाठवा. ई-मेल अॅप्लिकेशन फॉर्मसह सर्व महत्त्वाची कागदपत्रे अटॅच करा. अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख जून 2021 आहे.