एअर इंडिया खरेदी करण्याच्या तयारीत कर्मचारी, जाणून घ्या काय आहे त्यांचा प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   सुमारे 90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जात बुडालेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला आता अडचणीतून पुन्हा उभे राहण्यासाठी कर्मचार्‍यांचा एक गट उपयोगी ठरू शकतो. एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, एअर इंडियाचे काही कर्मचारी फायनान्शियल पार्टनर्ससोबत मिळून बिडिंगमध्ये भाग घेऊ शकतात. केंद्र सरकारसुद्धा मोठ्या कालावधीपासून एअर इंडियामध्ये निर्गुंतवणुकीची तयारी करत आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे निर्गुंतवणुक प्रक्रियेस अगोदरच खूप उशीर झाला आहे.

प्लॅननुसार, संकटात असलेल्या या विमान कंपनीला सध्याच्या स्थितीतून उभे करण्यासाठी आणि 51 टक्केची भागीदारी प्राप्त करण्यासाठी प्रतिकर्मचारी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागणार नाही, तर अन्य 49 टक्केची भागीदारी गुंतवणूकदारांकडे असेल. टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

प्रायव्हेट इक्विटी फंडद्वारे गुंतवणूकीच्या तयारीत कर्मचारी

संबंधित कर्मचार्‍यांमध्ये सर्क्युलेट होत असलेल्या एका इंटरनल नोटच्या संदर्भाने म्हटले आहे की, या कर्मचार्‍यांच्या समूहाने एक प्रायव्हेट इक्विटी फंडद्वारे एअर इंडियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी संपर्क केला आहे. यामध्ये कर्मचार्‍यांसाठी 51 टक्के आणि गुंतवणूकदारांसाठी इतर 49 टक्केचा प्लॅन आहे. कर्मचार्‍यांच्या समूहाने प्रायव्हेट इक्विटी फंड यासाठी गुंतवणुकीसाठी निवडले आहे, कारण त्यांच्याकडे व्यक्तिगत प्रकारे गुंतवणूक करण्याचे साधन नाही.

प्रतिकर्मचारी एक लाख रुपये

कर्मचार्‍यांना एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) पूर्ण होण्यापूर्वी पैशांची चिंता करावी लागणार नाही. पहिली स्टेज यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर एक प्लॅन तयार केला जाईल, ज्यामध्ये कोणत्याही कर्मचार्‍याला एक लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान द्यावे लागणार नाही.

14 डिसेंबर आहे बिडिंग डेडलाइन

मात्र, या रिपोर्टमध्ये हेसुद्धा सांगण्यात आले आहे की, टाटा ग्रुपसुद्धा एअर इंडियामध्ये गुंतवणुकीच्या तयारीत आहे. महाराजाची संस्थापक टाटा ग्रुपच आहे. जर टाटा ग्रुपच्या हातात पुन्हा एअर इंडियाची सूत्र येऊ शकतात. बिडिंगसाठी डेडलाइन 14 डिसेंबर ठरली आहे. यानंतर क्वाॅलिफाईड बिडर्सला 28 डिसेंबरपर्यंत निवडण्याबाबत माहिती दिली जाईल.