कोझिकोड धावपट्टीचे विस्तारीकरण तातडीने व्हावे, ‘डीजीसीए’च्या माजी प्रमुखांची स्पष्टोक्ती

पोलिसनामा ऑनलाईन – केरळमधील कोझिकोड येथील टेबलटॉप धावपट्टीवर झालेल्या विमान अपघातास अनेक घटक कारणीभूत असू शकतात, पण तातडीने या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्याची गरज आहे, असे मत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) माजी प्रमुख इ. के. भारतभूषण यांनी व्यक्त केले आहे.

दुबईहून आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरत जाऊन दरीत कोसळून 18 जण ठार झाले. कोझिकोडमधील करीपूर विमानतळावरची धावपट्टी 1988 मध्ये तयार करण्यात आली. त्यानंतर 2012 मध्ये हवाई वाहतूक महासंचालनालयाचा प्रमुख असताना मी या विमानतळावरील सुरक्षा त्रुटींमुळे तेथून विमान उड्डाणे बंद करण्याचा इशारा दिला होता. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोझिकोडची धावपट्टी विस्तारण्याची सूचना अनेकदा केली होती. दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झाली नाही.

महासंचालक असताना मी त्यासाठी प्रयत्न केले. पण त्याला स्थानिक पातळीवर जमीन अधिग्रहणाबाबत विरोध झाला होता. निदान आता तरी सर्वाना या प्रकरणाचे गांभीर्य कळले असेल. हा विमानतळ झाला तेव्हा मी जिल्हाधिकारी होतो. नंतर हवाई वाहतूक संचालनालयाचा महासंचालक असताना मी धावपट्टीच्या विस्तारासाठी प्रयत्न केले, कारण मंगळुरुची दुर्घटना डोळ्यासमोर होती पण लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. हवाई वाहतूक संचालनालयाचे महासंचालक असताना करीपूर विमानतळ बंद करण्याचा इशारा इ. के . भारतभूषण यांनी दिला होता. विमानतळांच्या निगा व दुरुस्तीवर दुमत असू शकत नाही. त्यामुळे एकदा मी करीपूर विमानतळावरून उड्डाणे बंद करण्याचा इशारा दिला होता. मी मूळ मलबारचा आहे, त्यामुळे हा विषय मला जवळचा आहे. त्या वेळी सर्वेक्षण करण्यास गेलेल्या चमूला लोकांनी मारहाण केली.