केरळ विमान दुर्घटनेतील 2 मृत ‘कोरोना’ पॉझिटिव्ह,मदत कार्य करणार्‍यांची होणार टेस्ट

कोझिकोडे : वृत्तसंस्था – केरळमधील कोझिकोडे येथे झालेल्या विमान दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहे. मुसळधार पावसामुळे धावपट्टीवर उतरताना विमान घसरल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांपैकी दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या दुर्घटनेनंतर मदत करणाऱ्या आणि बचाव कार्यात सहभागी झालेल्या सर्वांची कोरोना चाचणी करवी लागणार आहे. या वृत्ताला केरळ सरकारमधील मंत्री ए.सी. मोइद्दीन यांनी दुजोरा दिला आहे.

कोरोनामुळे दुबईत अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन येणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान शुक्रवारी दुर्घटनाग्रस्त झाले. शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे केरळमधील कोझीकोडे येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन वैमानिकांचाही समावेश आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसचे हे विमान बोईंग 737 होते. ते ठरल्या वेळी म्हणजे सायंकाळी 7.41 वाजता विमानतळावर उतरत असताना अपघातग्रस्त झाले. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विमानात 174 प्रौढ प्रवाशी, 10 तान्ही मुले, 2 वैमानिक आणि 4 विमान कर्मचारी असे एकूण 190 जण होते. जिथे अपघात झाला ते विमानतळ डोंगरमाथ्यावर आहे व त्याच्या धावपट्टीवर दुतर्फा दरी आहे. सुदैवाने धावपट्टीवरून घसरले तेव्हा विमानाचा वेग बराच कमी झाला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like