Airbags | सरकारचा नवीन प्रस्ताव ! कारमध्ये किमान 6 एयरबॅग असाव्यात, परिणाम – किंमत 30 ते 50 हजाराने वाढणार

नवी दिल्ली : Airbags | रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे की, कार उत्पादकांनी भारतात विकल्या जाणार्‍या सर्व कारमध्ये किमान 6 एयरबॅगचे एक स्टँडर्ड फीचर बनवले पाहिजे. 6 एयरबॅग (Airbags) निसंशय ग्राहकांना कारमध्ये चांगली सुरक्षा प्रदान करतील, परंतु याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होईल, विशेषता एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये.

मात्र, हा प्रस्ताव एखाद्या मोठ्या दुर्घटनेत लोकांचा जीव वाचवू शकतो, ज्यासाठी कोणतीही किंमत जास्त नाही. जर हा प्रस्ताव लागू झाला तर अनेक प्रश्न समोर येणार आहे.

6 एयरबॅगचा खर्च किती वाढणार?

सरासरी, एका कारमध्ये फ्रंटल एयरबॅग लावल्यास 5,000-8000 रुपयांच्या दरम्यान खर्च येतो, तर
एका साईड आणि कर्टेन एयरबॅगची किंमत खुप जास्त असू शकते. याचा अर्थ छोटी ते मिड-लेव्हल
सेगमेंटमध्ये विकल्या जाणार्‍या प्रत्येक कारची किंमती जवळपास 30,000 रुपयांपासून 50,000
रुपयांपर्यंत वाढेल.

हा अंदाज केंद्र सरकारद्वारे भारतात विकल्या जाणार्‍या सर्व कारवर ड्यूअल एयरबॅग अनिवार्य
केल्यानंतर अपेक्षित मूल्यवाढीवर आधारित आहे, जो लागू होण्याची तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे.

6 एयरबॅग साईड-इफेक्ट सेफ्टी देतात, ज्या सध्या एंट्री-लेव्हल सेगमेंटच्या लोकांसाठी खुप कमी
आहे. भारतात एंट्री लेव्हल कार बहुतांश कौटुंबिक वापरासाठी असते, ज्यामध्ये किमान दोन सदस्य पाठीमागे बसलेले असतात.

हे देखील वाचा

Pune Police | आयुक्तालयातील 145 पोलिस शिपाई ते सहाय्यक उपनिरीक्षकांच्या बदल्या, काही जणांच्या बदलीला स्थगिती

Pune Crime | सराईत गुन्हेगार ओंकार बाणखेले खूनप्रकरणी 7 जणांना अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Airbags | government s new proposal cars should have at least 6 airbags result the price will increase by 30 to 50 thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update