हवाई दलाचे मिग विमान कोसळले

जोधपूर : वृत्तसंस्था 

हवाई दलाचं मिग-२७ विमान राजस्थानातील जोधपूरमध्ये कोसळले आहे. या अपघातातून वैमानिक सुखरुप बचावल्याची माहिती मिळते आहे.  पूर्व जयपूरमधील बनाड पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या देवलिया गावाजवळ हवाई दलाचे विमान कोसळले विमान कोसळण्याच्या आधी वैमानिक सुरक्षित बाहेर आला.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B07GVMTWWX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’98ed294f-b003-11e8-b4e3-63ebc482ece8′]

हवाई दलाचं मिग-२७ विमान मोकळ्या जागेत कोसळले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. विमान जमिनीवर कोसळताच आगीचे लोट उसळले. यानंतर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि हवाई दलाचे अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. तांत्रिक कारणामुळे या विमानाचा अपघात झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता हवाई दलाकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र या घटनेची चौकशी करुन अपघाताचं नेमके कारण शोधण्यात येईल, अशी माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे.

सुवर्ण यश मिळवून देणाऱ्या तेजिंदरच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलीच नाही

यापूर्वी जून २०१६, जानेवारी २०१५ आणि फेब्रुवारी २०१० अशा तीन घटनांमध्ये हवाई दलाच्या मिग २७ विमानाला अपघात झाले आहेत.युद्धात सर्वात अत्याधुनिक म्हणून काही दशकापूर्वी सोव्हिएट युनियनच्या मिग विमानाला मोठी मागणी होती. परंतु, त्यानंतर गेल्या दशकभरात सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे याच मिग विमानाविषयी मोठी टिका होऊ लागली आहे. काही वर्षांपूर्वी मिग २१ ला झालेल्या लागोपाठ अपघातानंतर हवेतील कफन म्हणून त्यांचा उल्लेख केला जाऊ लागला होता. १९७२ ते २०१२ या ४० वर्षात विविध प्रकारच्या मिग विमानाचे ४८२ अपघात जगभरात झाले आहेत़