Airtel चा जबरदस्त प्लान ! केवळ 1 रुपया जास्त दिल्याने मिळणार दुप्पट वैधता, जाणून घ्या प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअरटेल (Airtel) टेलिकॉम कंपनीने ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लान जारी केला आहे. या कंपनीने अनेक विविध प्लान आणले आहे. तर सध्या जारी केलेला २ प्लान त्याची ऑफरमध्ये फक्त १ रुपयाचा फरक आहे आणि फक्त १ रुपयांमध्ये दुप्पट वैधता मिळणार आहे. नेमकं काय आहे ऑफर याबाबत सविस्तर जाणून घ्या.

कशी असणार दुप्पट वैधता?
Airtel चे ग्राहकासाठी ३९८ रुपये आणि ३९९ रुपयांचे २ पर्याय रिचार्जसाठी आहेत. तर ३९८ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकाला फक्त २८ दिवसाची वैधता असणार आहे. मात्र खासकरून ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकाला तब्बल ५६ दिवसांची वैधता असणार आहे. यामध्ये केवळ १ रुपयाचा फरक पडतो.

३९८ चा प्लान –
Airtel चा ३९८ रुपयांमध्ये २८ दिवसांची वैधता आहे. यामध्ये सर्व नेटवर्कवर Unlimited calling आणि डेली १०० sms दिले जाते. तसेच रोज 3 GB data दिला जातो. ग्राहकाला एकूण 84 GB data दिला जातो. प्लानमध्ये प्राइम व्हिडिओचे मोबाइल एडिशन फ्री ट्रायल दिले जाते. याव्यतिरिक्त, Airtel Xstream Premium, Unlimited चेंज सोबत फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूजिक, १ वर्षाची वैधतासह शॉ अॅकॅडमी चे फ्री ऑनलाइन कोर्स आणि फास्टॅग च्या खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे.

३९९ चा प्लान –
यामध्ये ५६ दिवसांची वैधता आहे. यात 1.5 GB data मिळणार आहे. यामध्ये ग्राहकाला 84 GB data दिला जातो. यात सर्व नेटवर्कवर Unlimited calling आणि रोज १०० sms दिले जातात. सोबत प्राइम व्हिडिओचे मोबाइल एडिशन फ्री ट्रायल दिले जाते. याव्यतिरिक्त, Airtel Xstream Premium, Unlimited चेंज सोबत फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूजिक, १ वर्षाची वैधता सोबत शॉ अ‍ॅकॅडमी चे फ्री ऑनलाइन कोर्स आणि फास्टॅगच्या खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक दिला जातो.