जिओ आणि एअरटेलचं ‘ऑफर’वॉर ! Jioला टक्‍कर देण्यासाठी Airtelकडून ‘फक्‍त’ ९७ रूपयाचा ‘प्लॅन’ बाजारात

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवताच जिओने मोठा धमाका केला होता. सहा महिने मोफत सेवा देऊन त्यांनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले होते. मात्र जिओच्या प्रवेशामुळे अनेक टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले होते. त्यांना त्यांना देखील यामुळे आपल्या दरात कपात करावी लागली होती. त्यानंतर गेली ३ वर्ष जिओने आपल्या ग्राहकांना वेगवेगळी ऑफर देऊन बांधून ठेवले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एअरटेलने नवा ९७ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे.

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, प्रतिदिवशी १०० एसएमएस आणि २ जीबी डेटाची सुविधा देण्यात येणार आहे. हा नवीन प्लॅन सध्या आंध्र प्रदेश, तेलंगाना आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील जुन्या प्लॅनमध्ये काही बदल करून कंपन्या नवीन प्लॅन बाजारात आणत असतात. त्यानुसारच हा प्लॅन देखील तयार करण्यात आला आहे. याअगोदर या प्लॅनमध्ये १.५ जीबी डेटा आणि ३५० मिनिटांच्या व्हॉईस कॉलिंग मिळत होते. त्यामुळे जिओच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी बाजारात आणलेल्या या रिचार्जला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ९७ रुपयांच्या या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे.

दरम्यान, या ९७ रुपयाच्या प्लॅनबरोबरच एअरटेलने ३५रुपये, ६५रु, ९५ रु आणि ९९ रुपयांचे प्लॅन देखील बाजारात आणले आहेत. त्याचबरोबर आणखी विविध प्लॅन देखील बाजारात आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

Loading...
You might also like