Airtel ची नवीन रिचार्ज ‘स्कीम’ ! मिळणार ‘Disney+ Hotstar VIP’ ची सदस्यता, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – भारतीय दूरसंचार कंपनी एअरटेलने नवीन प्री-पेड योजना बाजारात लॉन्च केल्या आहेत, ज्याची किंमत 448 रुपये, 499 रुपये, 599 रुपये आणि 2,698 रुपये आहेत. या रिचार्ज योजनांमध्ये ग्राहकांना Disney+ Hotstar VIP सब्सक्रिप्शनसह डेटा आणि व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल. याशिवाय या दोन्ही योजनांमध्ये एअरटेलकडून ग्राहकांना अतिरिक्त लाभही देण्यात येणार आहेत. एअरटेलने चार महिन्यांपूर्वी 401 प्रीपेड योजना सुरू केली होती ज्यात युजर्सना Disney+ Hotstar ला विनामूल्य एक वर्षाची सदस्यता दिली जात होती.

एअरटेलचे प्रीपेड युजर्स आता ही योजना एअरटेल वेबसाइट आणि एअरटेल थँक्स अ‍ॅप या दोन्हीवर सक्रिय करू शकतात. व्हीआयपी सदस्यतेमध्ये सात मल्टिप्लेक्स ब्लॉकबस्टर, Disney+ शो / चित्रपट / मुलांची सामग्री (डब), लाईव्ह खेळ, अनन्य हॉटस्टार स्पेशल, भारतीय टीव्ही शोचे नवीन भाग समाविष्ट आहेत.

या योजनांविषयी जाणून घ्या-

एअरटेलची 448 रुपयांची योजना-
डिस्टनी + हॉटस्टार व्हीआयपीच्या ग्राहकांकरिता एअरटेलच्या नव्या योजनेचे वर्गणी व्यतिरिक्त, एअरटेल प्रीपेड योजना अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल, दररोज 100 एसएमएस संदेश आणि 3 जीबी हाय-स्पीड डेटा 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. या पॅकची वैधता 28 दिवसांची आहे.

499 रुपयांची एअरटेल योजना –
या योजनेमध्ये Disney + Hotstar VIP सब्सक्रिप्शनसह 448 योजनेप्रमाणेच वैशिष्ट्ये ऑफर करते. तथापि, हे विशेषत: “फर्स्ट टाइम रिचार्ज” (एफटीआर) म्हणून डिझाइन केले गेले आहे आणि केवळ नवीन एअरटेल प्रीपेड ग्राहकांना उपलब्ध आहे.

599 रुपयांची एअरटेल योजना
या नवीन रिचार्ज योजनेत ग्राहकांना Disney+ Hotstar VIP सदस्यता मिळेल. यासह या योजनेत युजर्सला दररोज 2 जीबी डेटासह 100 एसएमएस दिले जातील. अन्य फायद्यांविषयी बोलायचे म्हणले तर, कंपनी या योजनेत ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगची सुविधा देईल. त्याच वेळी या रिचार्ज पॅकची वैधता 56 दिवस आहे.

एअरटेलची 2,698 रुपयांची योजना –
2,698 रुपयांच्या योजनेत एअरटेल एक वर्षासाठी Disney+ Hotstar VIP सदस्यता देत आहे. अन्य फायद्यांविषयी बोलायचे म्हणले तर, युजर्सला या रिचार्ज योजनेत दररोज 2GB डेटा मिळेल. तसेच दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. या रिचार्ज पॅकची वैधता 365 दिवस आहे.