विवेक ओबेरॉयच्या मीम्सनंतर ऐश्वर्याने शेअर केला ‘हा’ फोटो, अभिषेक बच्चनने केली ‘ही’ कमेंट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता विवेक ओबेरॉयने नुकताच एक्झिट पोलचा फोटो शेअर केला होता. ज्यात ऐश्वर्या रॉयची खिल्ली उडवली होती. शिवाय ती एकाच फोटोत सलमान खान, त्यात विवेक ओबेरॉय आणि नंतर अभिषेक बच्चन सोबत दिसत आहे. हा फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाला होता. शिवाय या फोटोमुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.

विवेकने ऐश्वर्याचे हे मीम शेअर केल्यानंतर तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. अनेक युजर्सचे म्हणणे होते की, त्याने हा फोटो शेअर करून ऐश्वर्याचा अपमान केला आहे. ऐश्वर्या ही विवेकची एक्स गर्लफ्रेंड आहे. सोनम कपूर आणि अनुपम खेर यांसारख्या मोठ्या कलाकरांनीही विवेकची ही हरकत लाजिरवाणी असल्याचं म्हटलं होतं.

या प्रकरणावर विवेकचंही स्पष्टीकरण आलं आहे. त्याने म्हटलं आहे की, “जर ऐश्वर्या रॉय आणि सलमान खान यांना माझ्या ट्विटचा प्रॉब्लेम नाही तर, सोनम कपूरला काय अडचण आहे. मी सलमान खानची माफी मागू शकतो. मला त्यात काहीच अडचण नाही. पंरतु मी सोनम कपूरची माफी का मागू ? मला नाही वाटत की मी काही चुकीचं केलं आहे. बऱ्याच वाद विवादानंतर विवेकने त्याचं हे ट्विट डिलीट केलं होतं.

जेव्हा हा सगळा गोंधळ सुरु होता तेव्हा ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टीवल मध्ये आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवण्यात व्यग्र होती. सध्या ती भारतात परतली आहे. शिवाय तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून कान्समधील काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या पोस्टवरून सिद्ध होतं की विवेकच्या ट्विटने तिला काहीच फरक पडत नाही.

ऐश्वर्याने गोल्डन ड्रेसमधील आपली मुलगी आराध्या सोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यात कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, “‘My Sunshine Forever LOVE YOU’ ऐश्वर्याच्या या फोटोवर अभिषेक बच्चन आणि दीपिका पादुकोण यांनी कमेंट केली आहे. अभिषेकने म्हटले आहे की, ‘The gold standard!’ तर दीपिका पादुकोण म्हणते की, ‘That Face!!!!’