एश्वर्या रायचं सलमानपुर्वी याच्यावर होतं प्रेम !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सगळ्या प्रसिद्ध आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय आज आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. विश्वसुंदरीचा किताब पटकवणाऱ्या ऐश्वर्या रायचे करोडो चाहते आहे. आपल्या प्रोफेशनल लाईफमुळे ती जितकी चर्चेमध्ये असते तितकीच ती आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते.

आजही ती तितकीच सुंदर दिसते जितकी ती आपल्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये दिसत होती. चित्रपट क्षेत्रात येऊन तिला अनेक वर्षे झाली पण तिच्या सुंदरतेमध्ये जराही फरक पडला नाही. ऐश्वर्याने आपल्या रुपेरी कारकीर्दीची सुरुवात माणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटामधून केली.

तिने बॉबी देओलसोबत ‘और प्यार हो गया’ पहिल्या चित्रपटात काम केले होते. तो तिचा पहिला चित्रपट. दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा ‘जीन्स’ चित्रपटात देखील तिने काम केले. यानंतर तिने अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले. याच दरम्यान ती सलमान खानसोबतच्या अफेअरमुळे आणखी चर्चेत आली होती पण चाहत्यांना माहिती नसेल की सलमान खानच्या आधी ऐश्वर्या मॉडेलिंग करताना राजीव मूलचंदानीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तिने हे रिलेशन मिडियामध्ये कधीच कबूल केले नाही.

image.png
image.png
image.png
चित्रपटसृष्टीत ऐश्वर्या जसजशी प्रसिद्धी मिळवत गेली तसतसे तिने राजीवला टाळण्यास सुरुवात केली. राजीवनंतर तिच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री झाली आणि त्यांची केमिस्ट्री तर सगळ्यांनाच माहित आहे. सलमाननंतर तिच्या आयुष्यात विवेक देखील आला पण यांचे देखील नाते खूप काळ टिकले नाही. त्यानंतर ‘गुरु’ चित्रपटाच्या सेटवर अभिषेक आणि ऐश्वर्या रायच्या लवस्टोरीला सुरुवात झाली. यानंतर त्यांनी लग्न केले. २००७ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक विवाह बंधनात अडकले. त्यांना आराध्या नावाची गोंडस मुलगी देखील आहे.

image.png

Visit : policenama.com