‘2.0’ मध्ये ऐश्वर्याचा कॅमियो 

मुंबई : वृत्तसंस्था – 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रोबोट’ चित्रपटात ऐश्‍वर्या राय-बच्चनने प्रमुख भूमिका साकारली होती. आता ‘रोबोट’चा सिक्‍वेल ‘2.0’ प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ऐश्‍वर्याही आहे मात्र, तिने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे, असे दिग्दर्शक शंकर यांनीच याबाबतचा खुलासा करत सांगितले आहे की ‘2.0’ मध्ये ऐश्‍वर्याचा एक कॅमियो असेल.

ऐश्‍वर्याने ‘रोबोट’मध्ये सनाची भूमिका साकारली होती. आपल्या निर्मात्याचेच रूप घेऊन तयार झालेला ‘चिटी’ नावाचा रोबो तिच्या प्रेमात पडतो व चांगल्या रोबो पासून खलनायक रोबो कसा बनतो, असे  त्या चित्रपटामध्ये मध्ये दाखवण्यात आले होते. ‘सना’ची ही भूमिका ‘2.0’च्या पटकथेचाही एक भाग आहे. चित्रपटात तिच्या नावाचा उल्लेख अनेक वेळा येईल; पण वास्तवात ती दाखवली जाणार नाही. केवळ पाहुण्या कलाकारापुरतीच ऐश्‍वर्या यामध्ये दिसणार आहे. ‘2.0’ हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असून त्यामध्ये रजनीकांत, अक्षयकुमार, एमी जॅक्सन, आदिल हुसेन आणि सुधांशू पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटातील व्हीएफएक्स आणि अ‍ॅक्शन सीन्समुळे सध्या लोकांमध्ये ‘2.0’ बाबत उत्सुकता वाढत चालली असतानाच ऐश्‍वर्याच्या चाहत्यांना ही सुखद वार्ता समजली आहे. ‘2.0’ मध्ये अ‍ॅमी जॅक्सन एका रोबोटची भूमिका साकारत आहे. दरम्यान, या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून या गाण्यावर तब्बल 20 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. रजनीकांत आणि अ‍ॅमी जॅक्सन या दोघांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. येत्या गुरुवारी 29 नोव्हेंबर रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाने बाहुबली सिनेमाचेही रेकॉर्ड मोडले
बाहुबली सिनेमा 2017 मधला सर्वात हिट ठरला होता. यासिनेमाचे वैशिष्ट म्हणजे यातले वीएफएक्स होते. ‘बाहुबली 2’ देशभरातील 6500  स्क्रिनवर रिलीज करण्यात आला होता. मीडिया रिपोर्टनुसार रजनीकांत यांच्या 2.0 सिनेमाने बाहुबलीला मागे टाकले आहे. 2.0  चित्रपट 6800  स्क्रिनवर रिलीज करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे हा संपूर्ण चित्रपट 3-डीमध्ये शूट केला आहे, हे ही भारतात पहिल्यांदाच झाले आहे.